Dhule News : आयुर्वेदिक ‘कळलावी’ची वेल ठरले अनेक आजारांवर रामबाण औषध

Vine of Ayurvedic medicinal plant 'Kallavi' found in farm meadow near forest area.
Vine of Ayurvedic medicinal plant 'Kallavi' found in farm meadow near forest area.esakal

Dhule News : आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जैवविविधता टिकवून ठेवलेल्या वाल्हवे (ता. साक्री) येथील‌ वनक्षेत्रात कळलावी औषधी वनस्पतीची दुर्मिळ वेल आढळून आली आहे. शास्त्रीय नाव ग्लोरिसा सुपर्बा असलेल्या कळलावी औषधी वनस्पतीचे जतन, संवर्धन होणे आवश्यक असल्याचे मत वृक्ष, वनस्पतीप्रेमींनी व्यक्त केले आहे.

‘वनक्षेत्र’ मानवी जीवनाला खूप काही नैसर्गिक पद्धतीने देते असे सहज म्हटले जाते. शासन‌ यंत्रणादेखील पर्यावरण, वनसंवर्धनासाठी विविध प्रकारच्या योजनाही राबवीत असते. झुडपांवर वाढणाऱ्या कळलावी वेलीची फुले किती आकर्षक असतात ते फुले पाहून सहज लक्षात येते. आशिया खंडात केवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांत ही वनस्पती आढळत असल्याचे वनस्पतीतज्ज्ञ सांगतात. (Ayurvedic Kallavi wine can cure many diseases dhule news)

तसेच ती आफ्रिकेतही आढळली आहे. ही वेलवर्गीय वनस्पती असून, हिंदीत कलीहारी, संस्कृतमध्ये अग्निशिखा, मलबार, तर इंग्रजीत‌ ग्लोरी लिली म्हणून तिची ओळख आहे. गडद लाल पिवळी फुले मनाला सहज आकर्षित करतात. वाल्हवे गावापासून दक्षिणेला नवश्या सुकलाल पवार यांच्या शेतालगत‌ वृक्ष, वनस्पतीप्रेमी, माध्यमिक शिक्षक पी. पी. पवार यांना ही दुर्मिळ वनस्पती आढळली आहे.

कळलावीची वेल आधार मिळेल तिथे साधारणपणे पाच ते सात मीटरपर्यंत वाढत असल्याची माहिती अभ्यासक श्री. पवार यांनी दिली. तिची वैशिष्ट्ये म्हणजे पावसाळ्यात उगवते व नंतर सप्टेंबरपर्यंत फुललेली असते. नंतर पाण्याअभावी वेल सुकून जाते. सुकल्यानंतरही कळलावीचे कंद जमिनीत जिवंत राहतात हे विशेष.

‌‌अनेक आजारांवर ‘रामबाण’ औषध

कळलावीची वेल अनेक आजारांवर रामबाण औषध असल्याचा दावा ज्येष्ठ, अनुभवी करतात. सूज, व्रण, गंडमाळ‌ यांसारख्या विकारांवर कळलावीचा वापर होतो. कृमी, काष्ठ, विषमज्वर, दौर्बल्य, अशक्तपणा यातही कळलावी उपयुक्त आहे. शिवाय सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी व पारंपरिक औषधी पद्धतीने मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो.

Vine of Ayurvedic medicinal plant 'Kallavi' found in farm meadow near forest area.
Dhule News : पगारासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार 15 हजार! निवृत्तांसह सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्य

बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला ‘कळलावी’ म्हटले जात असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली. फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या वेलीला अग्निमुखी, अग्निशिखा, कलहारी, खड्यानाग, गौरीचे हात, नखस्वामिका, बचनाग व खुशी अशी खूप सारी नावे आहेत. फुले नसतानाही वेल तिच्या कुरळ्या कुरळ्या नखरेल पानांमुळे सहज ओळखू येते.

"वनक्षेत्रात नैसर्गिक पद्धतीने अनेक दुर्मिळ वनस्पती आढळतात. ती फक्त ज्येष्ठच ओळखू शकतात. वनसंपत्तीचे भविष्यात जतन, संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी युवा पिढीने अशा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत." -पी. पी. पवार, वनस्पती अभ्यासक तथा माध्यमिक शिक्षक, वाल्हवे

Vine of Ayurvedic medicinal plant 'Kallavi' found in farm meadow near forest area.
Dhule Crime News : देवभानेत परप्रांतीयाकडून 5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com