Inspirational News : बालमजुरी रोखण्यासाठी 'ते' करतायत दुचाकीने प्रवास; कापले 7500 किलोमीटर अंतर

Bachhao couple returned after traveling seven and a half thousand kilometers in the country
Bachhao couple returned after traveling seven and a half thousand kilometers in the country esakal

Inspirational News : येथील राणी अक्षय बच्छाव व त्यांचे पती अक्षय नारायण बच्छाव या दांपत्याने देशातील विविध राज्यात सुमारे ७ हजार ५०० किलो मीटर दुचाकीने प्रवास करून बालमजुरी रोखण्याचा संदेश दिला. त्यांचा नुकताच नंदुरबार येथे गौरव करण्यात आला. (bachhav couple convey message of preventing child labour by riding bike across india nandurbar news)

बालमजुरीच्या प्रतिबंधासाठी अर्थात ते रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. मात्र त्याला फारसे यश आले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांनी २०१० मध्ये यासाठी स्वतंत्र अभियान सुरु केले होते.

त्यानुसार शहरा-शहरात व ग्रामीण भागात याचा सर्व्हे झाला. तसा अहवाल एकात्मिक बालविकास विभागाने द्यावा, असे निर्देश असताना दिलेला अहवाल निरंक दाखविला. मात्र परिस्थिती जैसे-थे निर्माण झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bachhao couple returned after traveling seven and a half thousand kilometers in the country
Inspirational News : गोळा नव्हता म्हणून दगडाने केला सराव... दिव्यांग जना टोपलेंचे राष्ट्रीय स्पर्धेत ‘सुवर्ण’ यश!

म्हणून याचा लेखाजोखा मांडत नंदुरबार येथील बच्छाव दांपत्याने सात हजार ५०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून बालमजुरी रोखण्याचा संदेश दिला.

त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश देखील मिळाले. घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटेवरील खडतर प्रसंगांना तोंड देत राष्ट्रव्यापी बालमजुरी विरोधी चळवळ यशस्वी केल्याबद्दल बच्छाव दांपत्याला राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड तसेच, भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Bachhao couple returned after traveling seven and a half thousand kilometers in the country
Inspirational News : कामगारांना वैद्यकीय मदतीसाठी 2 लाखांचा निधी; जगताप बंधूंची वडिलांप्रति कृतज्ञता!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com