एक कोटी ८६ लाख खर्चाच्या 'या' रस्त्याची अवस्था तर पाहा..

nashik road.jpg
nashik road.jpg

नाशिक : पळसे शिवारातील जुना नाशिक साखर कारखाना म्हणून परिचित असणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसते. विशेष म्हणजे एक कोटी ८६ लाख खर्च केलेल्या या रस्त्याच्या कामाचे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलप यांनी स्वतंत्रपणे दोन वेळा  भूमिपूजन केले होते.त्यामुळे हा रस्ता अधिक चर्चेत आला होता.

खासदार गोडसे, आमदार घोलप यांनी केले स्वतंत्र भूमिपूजन

नाशिक सहकारी साखर कारखाना आपल्या गाव शिवारात असण्याचे   भूषण बाळगणाऱ्या पळसे ग्रामस्थांना मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे.पळसे गाव ते पंपिंग स्टेशन रस्त्याप्रमाणेच कारखाना रस्त्याची अवस्था दिसते. खासदार, आमदार यांनी दोन वेळा स्वतंत्र भूमिपूजन केले त्यामुळे रस्त्याचे काम देखील तेवढेच तोडीचे होईल, दोघेही लोकप्रतिनिधी कामात जातीने।लक्ष पुरवतील अशी अपेक्षा पळसेकराना होती.मात्र प्रत्यक्षात घडले उलटेच, रस्त्याचे कामकाज अन दर्जा याकडे दोनीही प्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, असा तक्रारीचा सूर उमटताना दिसतो आहे.

ग्रामसभेत तक्रारीचा पाडा

रस्त्याचे काम अर्धवट केले आहे, ठेकेदाराला सूचना देऊन काम पूर्ण करून घ्यावे, अशा स्वरूपाची तक्रार पळसे गावातील त्रस्त नागरीकांनी ग्रामसभेत केली. लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांचे लागेबंद असल्याने तक्रारी करूनही काहीएक उपयोग झाला झाला नाही , असा आरोप केला जातो आहे.

साठ टक्के नागरिकांना उपयोग

पळसे गावातील साठ टक्के नागरिकांना दररोज जुना कारखाना रस्त्याचा वापर करावा लागतो आहे.रस्त्यालगत मळे वसाहती, जोड रस्ते आहेत, नाणेगाव, दोनवाडे,शेवगे दारणा  , वडगाव पिंगळा   आदी  भागात जाण्यासाठी रस्ता जवळचा मार्ग आहे, रस्त्यावर कायम रहदारी ,वर्दळ असते.

प्रतिक्रिया 

रस्त्याच्या कामाला मंजूर केलेला खर्च , प्रत्यक्षात किती किलोमीटर अंतरावर काम झाले, त्याचा दर्जा याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात. ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे.- सुनिल गायधनी, नाशिक तालुका मनसे उपाद्यक्ष -

रहदारीचा रस्ता आहे, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला यांना ये जा करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वाहनधारकांची तारांबळ उडते. संबंधितांनी लक्ष पुरवायला हवे.अन्यथा नाईलाजाने आंदोलन छेडावे लागेल.- संतोष गायधनी, नागरिक - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com