बागलाणचे भूमिपुत्र संशोधक डॉ. जयेश सोनवणे यांचा शिंपी समाजातर्फे गौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो विद्यापीठात संशोधक म्हणून पदभारही स्वीकारणार आहेत. हा बहुमान मिळवून बागलाण तालुक्याचे नाव उंचावल्यामुळे सटाणा शहर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे काल गुरुवार (ता.२३) रोजी डॉ. सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.

सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो विद्यापीठात संशोधक म्हणून पदभारही स्वीकारणार आहेत. हा बहुमान मिळवून बागलाण तालुक्याचे नाव उंचावल्यामुळे सटाणा शहर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे काल गुरुवार (ता.२३) रोजी डॉ. सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.

येथील अहिर क्षत्रिय शिंपी समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय शिंपी समाजाचे कार्याध्यक्ष रवींद्र बागुल, सटाणा शहराध्यक्ष शशिकांत सोनवणे, मनोहर सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार चव्हाण म्हणाले, डॉ. सोनवणे यांनी कमी वयात संशोधक म्हणून मिळविलेल्या यशामुळे बागलाणचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग युवकांच्या रोजगार उभारणीसाठी व तालुक्याच्या विकासासाठी व्हावा अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिंपी समाजाचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांच्या हस्ते डॉ. सोनवणे यांचा गौरव करण्यात आला. त्यांचे वडील मनोहर सोनवणे व आई मालतीताई सोनवणे यांचाही समाजातर्फे सत्कार करण्यात आला. आजच्या युवकांनी डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक ह्या श्रेत्रात मर्यादीत न राहता संशोधन क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमास हरिभाऊ सूर्यवंशी, समाजाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा तरटे, शहराध्यक्ष कामिनी निकुंभ, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव, प्रीती कापुरे, छगन निकुंभ, खंडेराव जाधव, दिगंबर निकुंभ, समको बँकेचे संचालक दिलीप चव्हाण, नितीन बिरारी, चंद्रकांत निकुंभ, मोहन कापडणीस, संजय खैरनार, रोशन खैरनार, जयेश सोनवणे, वैभव बोरसे आदींसह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. युवक जिल्हाध्यक्ष प्रा. ललित खैरनार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर संदीप सोनवणे यांनी आभार मानले. 

डॉ. जयेश सोनवणे यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) व मोनॉश विद्यापीठ (मेलर्बन, ऑस्ट्रेलिया) येथून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी आयआयटी पवई येथे उर्जा प्रणाली विषयात संशोधन केले असून मोनॉश विद्यापिठात रसायन शास्त्रात संशोधन केले आहे. ते सुक्ष्मजीवशास्त्र, उत्प्रेरक शास्त्र, विद्युत रसायन, फ्युयल सेल, बायोफ्युयल आदी शास्त्रात पारंगत आहेत. त्यांचे विविध आंतरराष्ट्रीय शोधनिबंध नामांकित वैज्ञानिक नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले असून लंडन (इंग्लड) व अटलांटा (अमेरिका) येथील परिषदेत त्यांनी सादरीकरण केले आहे. सन २०१७ मध्ये त्यांना भारत सरकार कडून शास्त्री फेलोशिप (इंन्डो कॅनडीयन इन्स्टीट्युट) मिळाली होती. उर्जा व पर्यावरण संशोधन श्रेत्रातील कार्याबद्दल त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देऊन गौरव झाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baglan's land reform researcher Dr.Jayesh Sonawane flicitated by Shimpy community