esakal | निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग; नाशिकमध्ये धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Sanap

बाळासाहेब सानप यांनी तीन आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. विधानसभा पराभवानंतर लगेच हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रचारादरम्यान सेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या भेटीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग; नाशिकमध्ये धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरुच असून, नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले आहे.

बाळासाहेब सानप यांनी तीन आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. विधानसभा पराभवानंतर लगेच हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रचारादरम्यान सेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या भेटीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हाती दमदार नेता लागल्याचे सांगण्यात येत असून, याचा नाशिक महापालिका राजकारणावर परिणाम होणार आहे.

बाळासाहेब सानप यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर हाती शिवबंधन बांधले. निवडणुकीपूर्वी भाजप सोडून सानप राष्ट्रवादीत गेले होते. राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवत होते. सानप यांना हाताशी धरून पालिका काबीज करायची होती छगन भुजबळ यांची योजना पण तसे होताना आता  दिसत नाही. आता सानप शिवसेनेत गेल्याने महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.