निरीक्षणगृहातील मित्रांसोबत वरणबट्टीसह सिनेगितांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

बालनिरीक्षणगृहात मृणालीच्या वयाच्या मैत्रीणींसह लहान मुलं-मुली असा संपूर्ण गोतावळा एकवटला..केक कापल्यावर हॅप्पी बड्‌डेचे गीत या मुलांनी गाऊन तिचे अभिनंदन केले.केकचा आनंद घेतल्यावर अकरा वाजता जेवणाची वेळ झाली. मृणालीनेस्वत:च्या हाताने जेवण वाढून आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला

जळगाव - पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या 8 इयत्तेतील मृणाली डीगेश तायडे या बालिकेचा आठवा वाढदिवस आज बालनिरीक्षणगृहात साजरा झाला. कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या मृणालीनीला आजी-आजोबांनी वाढदिवसाचे गिफ्ट विचारले..आई-वडीलही तिच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत असताना कुठलंच गिफ्ट नकोय..नमागताच मला सर्व मिळतं..माझाही वाढदिवस पप्पांप्रमाणे त्याच निरीक्षण गृहातील मित्रमैत्रीणींसोबत धुमधडाक्‍यात साजरा करावा असे गिफ्ट मागितलेल्या मृणालीची इच्छा तायडे कुटूंबीयांनी पूर्ण करून बाल निरीक्षणगृहात धुमधडाक्‍यात तिचा वाढदिवस आज साजरा केला. 

मुलांना चांगले संस्कार घडावेत, उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे अशी प्रत्येकच आईवडिलांची अपेक्षा असते..मात्र, एकत्र कुटुंबातील संस्कार शाळकरी मुलांवर खोलवर रुजते याचाच विसर धकाधकीच्या जीवनात पालकांना पडला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीच पुर्णत: लोप पावली असून आजी-आजोबा, काका-काकू आणि चुलत भावंडाचा गोतावळा फारच कमी कुटुंबात बघायला मिळतो. असेच एकत्र कुटुंबात मृणाली तायडेचे गणेश कॉलनीत वास्तव्यास आहेत. आजोबा दामोदर तायडे भारतीय सेवेतून सेवानिवृत्त आजी जिल्हा पोलिसदलातून सेवानिवृत्त, काका रविंद्र बांधकाम विभागात अभियंता, वडील डिगेश सहाय्यक नगररचना कार आणि घरात काकू आई या दोन गृहिणी एकत्र कुटुंबात चुलत आणि सख्ये भाऊ एकत्र एका छताखाली वास्तव्यास आहेत. चारही भावंडांना कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण..मागण्या अगोदरच प्रत्येक गोष्ट वडील कधी काका तर नाहीच झाले तर आजी-आजोबा आणून देणार. अशातच मृणालीचा आठवा वाढदिवस कसा साजरा करावा याची कुटुंबात चर्चा सुरू होती. माझ्याकडून काय हवे..यासाठीच सगळ्यांनी मृणालीला विचारणा केली..त्यावर तिने कोणालाही काहीच भेटवस्तू न मागता..मला "त्या'..बाल निरीक्षणगृहातील मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायचाय असा हट्टधरला..हे ऐकून आजीसह वडील काकाही अवाक्‌ झाले. ताडकन वडिलांनी होकार देत दोनच दिवसात तयारी करून आज मृणालीचासह कुटुंब दिमाखदार वाढदिवस जिल्हाबाल निरीक्षणगृहात पार पडला.वडील डिगेश यांचे आजवरचे बहुतांश वाढदिवस याच निरीक्षणगृहात झाल्याने मृणालीला मिळणाऱ्या आनंदाची जाणीव होती, आणि त्यातूनच तिने हा हट्ट केल्याचे तिने सांगितलेच. 

केक पेस्ट्री वरणबट्टी 
बालनिरीक्षणगृहात मृणालीच्या वयाच्या मैत्रीणींसह लहान मुलं-मुली असा संपूर्ण गोतावळा एकवटला..केक कापल्यावर हॅप्पी बड्‌डेचे गीत या मुलांनी गाऊन तिचे अभिनंदन केले.केकचा आनंद घेतल्यावर अकरा वाजता जेवणाची वेळ झाली. मृणालीनेस्वत:च्या हाताने जेवण वाढून आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. हाच वाढदिवस शाळेत साजरा झाला असता तर, कदाचित पेन,पेन्सिल इतर भेटवस्तूही मिळाल्या असत्या मात्र, इतक्‍या मित्रांकडून एकाच वेळेस वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्याने मला खूप आनंद झाल्याचे ती म्हणाली. 

जेवणानंतर ऑर्केस्टा 
वाढदिवसाची पंगत उठल्यावर मुलांसाठी बालगितांसह विविध बहारदार गीतांचा ऑर्केस्ट्रा यावेळी सादर करण्यात आला. कार्यक्रमाला डीवायएसपी रवींद्र तायडे, बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर, नगररचना विभागाचे अभियंता विलास नायर, सहाय्यक अभियंता दिलीप तायडे, चंद्रशेखर तायडे, अशा मान्यवरांनी लाडक्‍या मृणालीच्या वाढदिवसाला हजेरी लावत आशीर्वाद दिलेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balnirikshangruh

फोटो गॅलरी