Banana Demand Hike : केळीचे पीक शेतकऱ्यांसाठी तारणहार; मागणी वाढल्याने भावही चांगला

banana crop
banana cropesakal

शहादा (जि. नंदुरबार) : तब्बल दोन वर्षांनंतर केळीची (Banana) मागणी वाढल्याने सद्यःस्थितीत केळीला चांगला भाव मिळत असल्याने यंदा केळीचे पीक शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरणार आहे. दरम्यान, मार्च, एप्रिल महिन्यात होणाऱ्या लागवडीसाठी आतापासूनच केळीच्या रोपांचे बुकिंग शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. (Banana crop is savior for farmers this year as demand for banana has increased current price is good nandurbar news)

केळीची रोपे वेळेवर मिळावीत, अशी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जात असते. जळगाव जिल्ह्यापाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड होते. साधारणतः चार हजार १५८ हेक्टरवर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे.

यंदा सुरवातीला केळीचे भाव कमी होते; परंतु त्यामानाने खर्च अधिक झाल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला होता. खर्च निघणार की नाही या विवंचनेत होता परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केळीला प्रचंड मागणी वाढल्याने व्यापारीही चांगल्या दरात केळी खरेदी करत आहेत. त्यामुळे यंदा केळीचे पीक फायदेशीर राहील, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. भाववाढीचा हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

रोपांचे बुकिंग

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मागणी वाढल्याने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली असून, पिलबागेला १४०० ते १७०० पर्यंत दर मिळत आत. ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

banana crop
नारोशंकराची घंटा : अहो, रद्दी फक्‍त एक किलो आहे..!

दुसरीकडे शेतकऱ्यांनी आगामी हंगामासाठी केळीच्या रोपांचे बुकिंग सुरू केले असून, केळीची रोपे वेळेवर मिळावीत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. मागील वर्षी चार महिन्यांपूर्वी केळीचे रोप बुक करूनही वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. सध्या केळीच्या खोडाऐवजी तयार रोपांना लागवडीस शेतकरी प्राधान्य देतात. कमी कालावधीत उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा मार्ग अवलंबला.

"गेल्या दोन-तीन वर्षांपासून केळीला भाव नव्हता. सध्या चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीला मिळणारा चांगला दर आणि पुढील वर्षी हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता केळीचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यासाठी रोपांचे बुकिंगही सुरू झाले असून, नर्सरी चालकांनीही शेतकऱ्यांना वेळेत रोपे उपलब्ध करून द्यावीत." -ईश्वर माळी, केळी उत्पादक शेतकरी, जयनगर

banana crop
Nashik News : ZP कार्यकारी अभियंता सोनवणे रुजू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com