बँकांच्या संपाने सामान्य मेटाकुटीस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

नंदुरबारः राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचारी संघटनांनी वीस टक्के वेतनवाढीची मागणी करीत पुकारलेल्या दोनदिवसीय संपाची सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी कल्पना नसल्याने अनेकांचा आज बॅंकेत येऊन प्रचंड हिरमोड झाला. दरम्यान, या संपामुळे जिल्हाभरात कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करीत घोषणाबाजी केली. उद्याही (ता. १) बँका बंद राहणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.

वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर सहमती न झाल्यामुळे देशभरातील सर्व सरकारी बॅंकांनी आज व उद्या (ता. १) दोनदिवसीय संप पुकारला आहे. मात्र, या संपाची सर्वसामान्य ग्राहकांना फारशी कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे आज बँकेच्या आवारात आले. मात्र, कुलूप असल्याने त्यांना नेमके काय? ते कळेना. संपाचा उलगडा झाल्याने अनेकांना गणित चुकल्यासारखे माघारी फिरावे लागले.

नंदुरबारच्या प्रारूप आराखड्यात ४५ कोटींची वाढ

नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँक, देना बँक, युनियन बँक, बडोदा बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा आदी शासकीय बँका आज बंद होत्या. कर्मचाऱ्यांनी सकाळी अकराला भारतीय स्टेट बँकेसमोर निदर्शने करीत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. मनोज पिंपळे, राजू शिरसाळे, कैलास सामुद्रे, सतीश वळवी, सुजाता जैन, अब्दुल रहिम, विलास मुळे, विकास सौंदाणे, कुलदीप कुमार, अजित कुमार, हर्षद कुमार, रोशन वसावे, प्रकाश महाले आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

मंदीवर मात, रोजगारनिर्मितीसाठी हवेत ठोस उपाय

ग्राहकांचे झाले प्रचंड हाल

संपामुळे बँकांच्या ग्राहकांचे हाल झाल्याचे दिसून आले. वेळावद गावातील नगीबाई वळवी या वृद्ध महिला पती सूर्या वळवींसोबत बडोदा बँकेत आल्या होत्या. संपाची माहिती नसल्याने त्यांच्यासह अनेकांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. ‘बँक बंद’मुळे मनस्ताप सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे बँकेत पैसे काढण्यासाठी आलो असता, बॅंक दोन ते तीन दिवस बंद राहणार आहे. हप्ता चुकणार आहे, पैसे काढता न आल्याने एक हजार दंड भरावा लागणार आहे, अशी कैफियत बद्रिझिरा गावातील बँक ग्राहकाने व्यक्त केली.

नवीन वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू होणे गरजेचे असताना सत्तावीस महिन्यांच्या वाटाघाटीनंतरही तोडगा निघालेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून सरकारने राबविलेल्या योजनांमुळे बँकांच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढला आहे. रिक्त झालेल्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे पगारवाढीची मागणी आहे.
- राजू शिरसाळे, बँक कर्मचारी
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank employees on strike in Nandurbar