Students
sakal
जळगाव: ‘बाटू’ विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील फार्मसीच्या विविध वर्ष व पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल लागून महिना उलटला, तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांच्या प्रती मिळालेल्या नाहीत. गुणपत्रिकांची मूळ प्रतच उपलब्ध नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील व अभ्यासक्रमांमधील प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.