"बेलगंगा'चा शुक्रवारी गाळपाचा प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे. 

चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यात प्रचंड उत्सुकता असलेल्या या सोहळ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी गृहनिर्माण मंत्री सुरेशदादा जैन, गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार सतीश पाटील, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्‍वस्त ऍड. कृष्णा ठोंबरे व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याहस्ते ऊस गाळप हंगामाचा प्रारंभ होईल. माजी मंत्री एकनाथराव खडसे अध्यक्षस्थानी राहतील.

याप्रसंगी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, आमदार किशोर पाटील, स्मिता वाघ, दलूभाऊ जैन, राधेश्‍याम चांडक, माजी आमदार आर. ओ. पाटील, आमदार सुरेश भोळे, शिरीष चौधरी, चंदूभाई पटेल, उन्मेष पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, राजीव देशमुख, राजेंद्र राठोड, जितेंद्र देशमुख व अजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपस्थितीचे आवाहन चेअरमन चित्रसेन पाटील, कार्यकारी संचालक नामदेव पाटील यांच्यासह अंबाजीचे सर्व भागधारक व कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

चित्रसेन पाटीलच ठरले "हिरो' 
जिल्हा बॅंकेच्या ताब्यात असलेला बेलगंगा साखर कारखाना बंद अवस्थेत असताना तालुक्‍यातील अनेक पुढाऱ्यांनी कारखाना पूर्ववत सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कृतीयुक्त कार्यक्रम कोणीच राबवला नाही. उलट हा कारखाना सुरू करण्यासाठी सुरवातीपासून प्रयत्नशील असलेल्या चित्रसेन पाटलांच्या या कामात प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या अनेकांनी आडकाठी देखील आणली. मात्र, स्थानिक भूमीपुत्रांची त्यांना खंबीर साथ लाभल्याने सर्व अडचणींवर मात करीत अखेर त्यांनीच कारखान्याचा पुन्हा धूर काढला. त्यामुळे कारखान्याच्या विषयात चित्रसेन पाटील हेच एकमेव हिरे ठरल्याच्या प्रतिक्रिया तालुक्‍यातून उमटत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belganga sugar factory season starts will be on friday