भुसावळ- रेल्वे प्रवाशांकडून अवैधरीत्या रोख व ऑनलाइन पैसे वसूल करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांसह त्यांच्या दोन टोळीप्रमुखांना येथील रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली. त्यांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता सर्व आठ आरोपींना न्यायाधीशांनी एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.