

नवापूर - तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसायातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. चौथ्या दिवशी सोमवारी मुजतबा व परवेज पोल्ट्री फार्ममध्ये ५६ हजार ४९१ पक्षी नष्ट करण्यात आले, तर एक लाख सात हजार २४० अंडी व साडेचार टन खाद्य नष्ट करण्यात आले. आतापर्यंत जवळपास दोन लाख कोंबड्या नष्ट करण्यात आले असून, सव्वाआठ लाख अंडी नष्ट करण्यात आली. २१.२२ टन पशुखाद्य नष्ट केले.