धुळे- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह चौघांना अटक करावी, अशी मागणी करत भाजप व भाजयुमोने धुळ्यात महाराणा प्रताप चौकात निदर्शने केली. पंडित नेहरू यांच्या काळात नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र सुरू झाले. नंतरच्या काळात या वृत्तपत्राची आर्थिक स्थिती बिघडली. अशा परिस्थितीत मनी लॉन्ड्रिंग घडले.