जिल्हा परिषद अध्यक्षपदाची राष्ट्रवादीला भाजपची "ऑफर' 

ncp and bjp.jpg
ncp and bjp.jpg

नाशिक : जिल्हा परिषदेच्या 2 जानेवारीला होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने सोमवार(ता. 23)च्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपदाची "ऑफर' दिली. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला असताना महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. मंगळवारी (ता. 24) कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक गटनेते यशवंत गवळी यांनी नाशिकमध्ये घेण्याचे ठरविले आहे. 

महाविकास आघाडीत चलबिचल

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेसोबत कॉंग्रेसची आघाडी झाली होती, याची आठवण कॉंग्रेसच्या नेत्यांनी करून देत विशेषतः विषय समिती सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नांदगावचे माजी आमदार ऍड. अनिल आहेर यांच्यासोबत माजी सभापती यशवंत पाटील यांनी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनावेळी कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. कॉंग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्षा नयना गावित यांनी शिवसेना सदस्यांच्या बैठकीसाठी यापूर्वी उपस्थित राहणे पसंत केले होते. शिवाय सभापती सुनीता चारोस्कर यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासह इतर दोन सदस्यांनी यापूर्वी शिवसेना "जॉइन' केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या आठपैकी चार सदस्य शिवसेनेत जाणार काय? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. तसे घडल्यास शिवसेनेच्या आघाडीच्या भूमिकेचा विचार करता पक्षाला अध्यक्षपद, राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद असे समीकरण पुढे आल्यास कॉंग्रेसतर्फे श्री. गवळी आणि अश्‍विनी आहेर यांचे नाव सभापतिपदाच्या उमेदवारीसाठी पुढे येण्याची शक्‍यता अधिक आहे. विषय समिती सभापतिपदाची निवडणूक 3 जानेवारीला होत आहे. 

...अन्यथा विरोधात बसू : कुंभार्डे 

नाशिकच्या एका हॉटेलमध्ये सोमवारी भाजपच्या सदस्यांची बैठक झाली. त्यासाठी जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्यासह 14 सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे म्हणाले, की मागील सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसमवेत भाजप आणि कॉंग्रेसच्या "ब' गटाची युती झाली होती. ही युती पाच वर्षांपासून कायम ठेवण्याची तयारी सदस्यांनी दर्शवली. मागील निवडणुकीप्रमाणे युती प्रामाणिकपणे राष्ट्रवादीने कायम ठेवल्यास भाजप उपाध्यक्षपदासाठी दावा करणार आहे. युती प्रामाणिकपणे कायम न ठेवल्यास मग मात्र विरोधात बसण्याची तयारी आमची आहे. 

राजकीय हालचालींचा घटनाक्रम 

- माजी खासदार समीर भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली. सर्वानुमते अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय झाला होता. 

- शिवसेनेच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिवसेना नेते संजय राऊत हे एकत्रित बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील असे करण्यात आले होते स्पष्ट. 

-भाजपचे नेते बुधवारी (ता. 25) माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन ठरविणार रणनीती. आठवड्याच्या अखेरीस भाजपचे सदस्य रवाना होतील सहलीसाठी 

-कॉंग्रेसच्या बैठकीला किती सदस्य उपस्थित राहणार? जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेणार काय? भाजपची "ऑफर' स्वीकारणार काय? हे प्रश्‍न महत्त्वाचे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com