esakal | धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

bhavli dam.jpg

शुक्रवारी (ता. 20) भावली धरणाच्या कडेला असलेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दुपारी चारला ते थांबले. धबधब्यावर कपडे भिजतील म्हणून त्यांनी कपडे व सोन्याच्या दागिन्यांसह क्रेडिटकार्ड आदी पत्नी व मेहुणीच्या पर्समध्ये ठेवून सर्व सामान कार (एमएच 05-सीएम7667)मध्ये मागील सीटवर ठेवून काच बंद करीत गाडी लॉक करून धबधबा परिसरात फिरण्यास गेले.

धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भावली धरणावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या गाडीची काच फोडून गाडीतील 28 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 25 हजार रुपये रोख चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अशी घडली घटना..

कल्याण (जि. ठाणे) येथील बालाजी पॅराडाइज, मंगलगड, नांदिवली, कल्याण (पूर्व) येथील रहिवासी अलोक अशोक बगाडे, त्यांच्या पत्नी सुनीता बगाडे, सासू तान्हूबाई केंग, आत्या लीलाबाई किर्वे, साडू गोकुळ रंधवे, सुप्रिया रंधवे असे एकत्रित देवदर्शनासाठी 19 डिसेंबरला निघाले होते. कल्याण परिसरात चोरांचे प्रमाण वाढल्याच्या भीतीने किमती दागिने व क्रेडिटकार्ड सोबत घेतले. आत्याची मुलगी आडसरे (इगतपुरी) गावात राहत असल्याने तिच्या घरी भेट देऊन शुक्रवारी (ता. 20) भावली धरणाच्या कडेला असलेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दुपारी चारला ते थांबले. धबधब्यावर कपडे भिजतील म्हणून त्यांनी कपडे व सोन्याच्या दागिन्यांसह क्रेडिटकार्ड आदी पत्नी व मेहुणीच्या पर्समध्ये ठेवून सर्व सामान कार (एमएच 05-सीएम7667)मध्ये मागील सीटवर ठेवून काच बंद करीत गाडी लॉक करून धबधबा परिसरात फिरण्यास गेले. तासाभराने फिरून आल्यानंतर मेहुणी सुप्रिया गाडीजवळ जाताच घाबऱ्या आवाजात ओरडल्याने सर्वजण तिच्याजवळ पोचले. गाडीची चालकाच्या बाजूची मागील काच फोडून चोरट्याने फोडून गाडीतील पर्ससह दागिने, बॅंकेचे क्रेडिटकार्ड चोरून नेल्याचे निदर्शनात आले. शोधाशोध करीत पोलिस ठाण्यात कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेची फिर्याद अलोक बगाडे यांनी दिली. 

असा मारला डल्ला 

आठ लाख 71 हजार व क्रेडिटकार्ड असा ऐवज असून, त्यात एक लाख 35 हजारांचे साडेचार तोळ्याचे गंठण, 90 हजारांचे तीन तोळ्यांच्या बांगड्या, एक लाख पाच हजारांचे साडेतीन तोळ्याचे नेकलेस, एक लाख पाच हजारांची तीन तोळ्यांची कर्णफुले, 60 हजारांच्या दोन तोळ्याच्या अंगठ्या, एक लाख पाच हजारांचे ब्रेसलेट, 75 हजारांचे कडे, 45 हजार, एक लाख पाच हजारांचे साखळी, 21 हजारांचे पेन्डल व रोख रक्कम 20 हजार 500 रुपये, तसेच पत्नी व मेहुणीचे क्रेडिट, डेबीटकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व आयकार्ड चोरीस गेले. 

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

पर्यटक व ग्रामस्थांत भीती

अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक अरुंधती राणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, गुन्हे शाखेचे पथक व इगतपुरी पोलिसपथक तपास करीत आहे. या घटनेमुळे भावली परिसरातील पर्यटक व ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. 

हेही वाचा >  हळदीत नाचताना फक्त धक्का लागला..अन् थेट हल्लाच..थरार...