Dhule Municipal Corporationsakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule Municipal Corporation : भाजपच्या विरोधकांकडून महापालिका ‘टार्गेट’!
रंगपंचमीपूर्वीच आरोपांची धुळवड; धुळ्यातून ५० बोअरवेल चोरीला गेल्याची तक्रार
धुळे- महापालिकेची निवडणूक दिवाळीत होण्याची शक्यता आहे. तरीही धुळे शहरात मात्र या निवडणुकीपूर्वी वातावरणात रंगत भरू लागली आहे. त्यात रंगपंचमीपूर्वीच भाजपच्या विरोधकांकडून आरोपांची धुळवड सुरू झाली आहे. भाजपसह महापालिकेच्या कारभाराप्रश्नी प्रशासनाला कसे घेरता येईल, यादृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणनीती अमलात आणल्याचे दिसून येत आहे. या रणनीतीच्या डावात महापालिकेला टार्गेट करतानाशिवसेना ‘उबाठा’ने ५० बोअरवेल चोरीला गेल्याची तक्रार केली आहे.