भाजपमधील बेशिस्ती उघड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

भडगाव: भाजप हा संघाच्या मुशीत वाढणारा शिस्तबद्ध पक्ष म्हणून नेहमी ओळखला जातो. मात्र, अलीकडे या पक्षात बेशिस्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदाराला सभेच्या स्टेजवर मारहाण करण्यात आली होती. नुकतीच जळगाव येथे जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीच्या ठिकाणी पक्षाच्या सरचिटणीसांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. त्यामुळे भाजपमधील "राडा' ची राजधानी जळगाव आहे की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. आता हे लोण भडगावपर्यंत येऊन ठेपले आहे. भडगावात कार्यकर्त्यांमध्ये "राडा' झाला नसला, तरी दोन गटांनी आमचाच तालुकाध्यक्ष म्हणून दावा केला आहे.

भडगाव: भाजप हा संघाच्या मुशीत वाढणारा शिस्तबद्ध पक्ष म्हणून नेहमी ओळखला जातो. मात्र, अलीकडे या पक्षात बेशिस्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदाराला सभेच्या स्टेजवर मारहाण करण्यात आली होती. नुकतीच जळगाव येथे जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीच्या ठिकाणी पक्षाच्या सरचिटणीसांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. त्यामुळे भाजपमधील "राडा' ची राजधानी जळगाव आहे की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. आता हे लोण भडगावपर्यंत येऊन ठेपले आहे. भडगावात कार्यकर्त्यांमध्ये "राडा' झाला नसला, तरी दोन गटांनी आमचाच तालुकाध्यक्ष म्हणून दावा केला आहे. असे आजपर्यंत कधीही घडले नव्हते.

शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष (कै.) उत्तमराव पाटील हे गिरणा पट्ट्यातील म्हणजेच वाघळीचे होते. मात्र, त्यांच्या गिरणा पट्ट्यातच तालुकाध्यक्ष निवडीवरून पक्षातील बेशिस्त समोर आली आहे. जिल्ह्यावरून एकाची, तर नंतर माजी जिल्हाध्यक्ष बैठक घेऊन दुसऱ्याचीच निवड जाहीर करतात. त्यामुळे भडगाव तालुकाध्यक्ष निवडीच्या गोंधळावरून भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे या बेशिस्तीबद्दल जिल्ह्यावरून अद्यापपर्यंत काही एक दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे "नरो वा, कुंजरो वा'ची भूमिका सोडून पक्षाने स्पष्ट भूमिका घेणे हिताचे ठरणार आहे. - सुधाकर पाटील, भडगाव

तालुकाध्यक्ष निवडीवरून गोंधळ

भडगावात तालुकाध्यक्ष पदासाठी बैठक झाली. त्यात मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. अखेर अंतिम चार जण तालुकाध्यक्ष पदासाठी ठाम राहिले. त्यामुळे तालुका निवड निरीक्षकांनी चार ही उमेदवारांचे नाव जिल्हास्तरावर पाठविले. त्यानंतर जिल्हास्तरावर कोअर कमिटीच्या बैठकीत ही नावे समोर ठेवण्यात आली. त्यानुसार जिल्हा कार्यालय मंत्र्याने जिल्ह्यातील निवड झालेल्या तालुकाध्यक्षांची यादी प्रसिद्ध दिली. ती जिल्हा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय धांडे, तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी घोषित केल्याचे म्हटले आहे. या यादीत भडगाव तालुकाध्यक्ष म्हणून नगरसेवक अमोल पाटील यांचे नाव आहे. मात्र, त्यानंतर 11 तारखेला भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या उपस्थितीत भडगावात कार्यकर्त्याची बैठक झाली. त्यात डॉ. संजीव पाटील यांनी तालुकाध्यक्ष म्हणून चुडामण पाटील यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपच्या तालुकाध्यक्ष निवडीवरून बेबनाव समोर आला.

पोेलिस ठाण्यातच करायला गेले स्टिंग पुढं काय झालं ते पहा...

...म्हणे जिल्हा कार्यालय मंत्र्याची चूक
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अमोल पाटील यांची निवड झाल्याचे पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन तालुकाध्यक्षाची निवड कशी काय, अशी विचारणा डॉ. संजीव पाटील यांना झाली असता त्यांनी जिल्हा कार्यालय मंत्र्यावर खापर फोडले. त्या यादीत 3-4 बदल होते, असा दावा डॉ. संजीव पाटील यांनी केला. मग प्रश्न असा उपस्थित होतो, की जिल्हा कार्यालय मंत्र्याने परस्पर यादी प्रसिद्ध दिली कशी? आदेशाशिवाय यादी प्रसिद्धीस दिली म्हणून त्यांच्यावर काही कारवाई का करण्यात आली नाही? आतापर्यंत जिल्ह्यावरून दुरुस्ती यादी का प्रसिद्ध झाली नाही? याबाबत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यदक आहे. अर्थात हेच पक्षहिताचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP party members Are loosing there Discipline In Bhadgaon