पोलिस ठाण्यातच ते करायला गेले स्टिंग पुढे काय झाले पहा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मोबाईलमध्ये कार्यालयातील कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण(रेकॉर्डींग) तपासल्या असता त्यात कार्यालयाच्या कामकाजाचे रेकॉर्डींग केल्याचे आढळून आले. तसेच पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्याशी मोबाईलवर झालेल्या संभाषणाचेही विनापरवानगी रेकॉर्डीग केल्याचे दिसून आले.

धुळे : पोलिस अधीक्षक कार्यालयामधील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात संशयित आरोपी महिलेकडून मोबाईलद्वारे स्टींग करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हा स्टींग पोलिसांनी वेळीच सावध होऊन हाणून पाडला याप्रकरणी संशयित दाम्पत्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

महिला पोलिस कविता प्रशांत देशमुख यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात लूटीचा दाखल गुन्हयातील संशयित सराफ व्यावसायिक वर्धमान लालाचंद जैन(38) व सारिका वर्धमान जैन(34) दोघे रा.अमळनेर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यांना 31 जानेवारीपर्यंत तपास अंमलदार यांच्याकडे दररोज व फेब्रुवारीपासून आठवडयातून दोन दिवस हजेरी लावण्यात आली आहे. त्यानुसार जैन दाम्पत्य बुधवारी(ता.15) दुपारी एकला गुन्हे शाखेत पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्या दालनात हजेरी लावली. त्यावेळी सारिका जैन हिने तिच्या मोबाईलमध्ये कार्यालयातील कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण(रेकॉर्डींग) तपासल्या असता त्यात कार्यालयाच्या कामकाजाचे रेकॉर्डींग केल्याचे आढळून आले.तसेच 
पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्याशी मोबाईलवर झालेल्या संभाषणाचेही विनापरवानगी रेकॉर्डीग केल्याचे दिसून आले.याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही.असे दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सारिका जैन विरूध्द शासकीय कार्यालयीन गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule police station woman sting opration

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: