अनेक बडे नेते रात्रीतून भाजपमध्‍ये दिसणार : BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

State president of BJP Chandrashekhar Bawankule speaking at the press conference
State president of BJP Chandrashekhar Bawankule speaking at the press conference esakal

नंदुरबार : नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व पालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप व शिंदे गट एकत्र लढतील. राज्यातल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार आहेत. राज्यातील सरकार जसे रात्रीतून बदलले तसेच काही बडे नेते रात्रीतून भाजपमध्ये दिसतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. (BJP state president Bawankule statement nandurbar Latest Political News)

श्री. बावनकुळे मंगळवारी (ता. १३) नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, डॉ. शशिकांत वाणी आदी उपस्थित होते.

सध्याचे सरकार शिंदे-फडणवीस सरकारची बुलेट ट्रेन असून, जुने सरकार तीनचाकी रिक्षा होती. त्यामुळे विकासाच्या कामात निश्चितच फरक दिसेल, असे सांगत बावनकुळे म्हणाले, ‘‘राज्यातले विरोधी पक्षाचे नेते सत्ता गेल्याने बावचळले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्या आरोपांची दखल का घ्यावी? त्यांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी आहेत. याकूब मेननच्या कबरीचे सुशोभीकरण हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच झाल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी.’’

State president of BJP Chandrashekhar Bawankule speaking at the press conference
समांतर बाजारपेठ भोंगळे रस्त्याला आले ओंगळ स्वरूप; पायी चालणे बनले दुरापास्त

नंदुरबार पालिकेसह जिल्ह्यातील सर्व पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच आगामी सर्व निवडणुकांबाबत नंदुरबार जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटात गेलेले नेते यांच्याशी चर्चा करून समन्वयाने याबाबत निर्णय घेण्यात येईल. आपापसांत असणारे मतभेद मिटवून एकत्र निवडणुका लढविल्या जातील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

स्थानिक संस्था तसेच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ४५ प्लस खासदार, २०० प्लस आमदार आम्ही महाराष्ट्रात निवडून आणणार आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण योजना गरजू लोकांना पोचल्या पाहिजेत. मधल्या काळात कोणत्याही योजनेचा लाभ पोचला नाही. प्रत्येक खात्याचा निधी त्यासाठीच संपूर्णपणे खर्च झाला पाहिजे. दुसऱ्या खात्याकडे वर्ग होता कामा नये याची काळजी घेतली जाईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये गांधीजींचा एकही विचार दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

State president of BJP Chandrashekhar Bawankule speaking at the press conference
अमेरिका व महाराष्ट्रातील विद्यापीठांत शैक्षणिक देवाण घेवाणीची गरज : कोश्यारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com