भाजपाला पंचायत समितीत मिळालेल्या यशाचे शिल्पकार कोण? वाचा..

BJP win Panchyayat Samitee Election inTaloda
BJP win Panchyayat Samitee Election inTaloda

तळोदा: तालुका पंचायत समितीत भाजपच्या पाच सदस्यांच्या बळावर सभापती मिळविले असून २००६-०७ नंतर प्रथमच भाजपने हे यश मिळविले आहे. या दोन्हीवेळी भाजपला सत्तेत बसविण्यात पिता आणि पुत्रांचा तलेच प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. माजी आमदार उदेसिंग पाडवी २००६-७ तर २०२० मध्ये विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

तळोदा तालुक्यातील पंचायत समितीचा राजकीय इतिहास पाहता काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. ग्रामीण भागातील काँग्रेसचे मजबूत जाळे तर भाजप ग्रामीण भागात कमजोर स्थितीत होता. २००६-७ मध्ये जिल्हा सरचिटणीस उदेसिंग पाडवी यांनी संख्याबळ कमी असूनही ऐनवेळी बाजी पलटवू भाजपचे मोहन सक्कन ठाकरे यांना सभापती केले होते. उदेसिंग पाडवी एक आक्रमक नेता म्हणून परिचित होते. तेव्हाचा भाजपचा विजय तळोदा पंचायत समितीवरील प्रथमच होता.

यंदा पंचायत समिती निवडणुकीत ग्रामीण भागात संपर्क वाढवून एकूण दहा सदस्यांपैकी प्रथमच पांच भाजपच सद्स्य निवडून आणल्याचे कसब साधले. तळोदा तालुक्यातील काँग्रेसचे पांच सदस्य असतांना संख्या समसमान असतांना त्यांना विकासाच्या मुद्यांवर एकत्रित करण्याचा शिष्टाई आमदार राजेश पाडवी यांनी यशस्वी झाली आहे. सध्या ते शहादा तळोदा मतदारसंघाचें आमदार आहेत. येणाऱ्या काळात निश्चितच त्यांना याचा राजकीय फायदा होऊ शकतो.

एक आमदार या नात्याने तालुक्यातील विकास कामाना राजकीय अडथळा देखील त्यांनी दूर करत ग्रामीण भागात विकास कामे करण्यासाठी पक्षाचे राजकारण आड आल्यास असंख्य अडचणी येतात. हे अंदाज बांधून त्यांनी पंचायत समितीमधील अंतर्गत राजकीय ओढाताण देखील कमी होणार आहे. अर्थात यात काँग्रेसचे देखील समान संख्याबळ असून देखील माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी दिलेला सकारत्मक प्रतिसाद तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाला गती मिळेल यात शंका नाही किंबहुना तशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. विद्यमान आमदार राजेश पाडवी असून राजेश पाडवी हे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचे सुपुत्र आहेत.

१४ वर्षाचा वनवास 
तळोदा तालुका पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, याला डॉ. विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसला हादरा दिला. मात्र नंतर डॉ. विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पकड सुटली. यंदा झालेला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकित तर राष्ट्रवादीने तालुक्यात उमेदवारी देखील केली नाही.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपात उडी घेतली. यंदा भाजपला त्याचा कुठंतरी फायदा झाला असे देखील म्हणावे लागेल.

आमदारांची शिष्टाई
आज झालेली निवड ही नवीन राजकीय पायंडा पाडणारी असून दहा जागापैकी पाच अशी स्थिती असताना तसेच कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या तळोदा पंचयात समिती स्वतःकडे ठेवण्यासाठी निवडणूक अथवा ईश्वरचिठ्ठी असे पर्याय होते. सदस्य फोडाफोडीच राजकारण देखील होऊ शकले असते. मात्र तूर्तास आमदार राजेश पाडवी यांची भूमिका व माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांची सकारात्मक भूमिका तूर्तास आमदार यांची शिष्टाई यशस्वी झाल्याचे बोलले जाते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com