फसव्या छायाचित्रांद्वारे 'ओएलएक्‍स'वर फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली, आता अधिक पैशांसाठी समोरच्याने तगादा लावला. मात्र, खातरजमा केल्यावर हा फसवणुकीचा गोरखधंदा असल्याचे उघड झाले अन्‌ पुढचा व्यवहार थांबला.

जळगाव - जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली, आता अधिक पैशांसाठी समोरच्याने तगादा लावला. मात्र, खातरजमा केल्यावर हा फसवणुकीचा गोरखधंदा असल्याचे उघड झाले अन्‌ पुढचा व्यवहार थांबला.

जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनी येथील रहिवासी मयूर दिगंबर डांगे या तरुणाने "ओएलएक्‍स' या ऑनलाइन खरेदी-विक्री पोर्टलवर "5-जी' मॉडेल असलेल्या होंडाची दुचाकी पसंत केली. गाडीच्या छायाचित्रांसह मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यावर संबंधित व्यक्तीने आपली ओळख देताना सेनेत कार्यरत जवान असून, अवघे काही महिने वापरलेली दुचाकी 22 हजारांत विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यावर मयूरने सौदा करताना 19 हजारांत ठरवले.

संबंधित व्यक्तीने दिलेल्या बॅंक खात्यावर 5 हजार रुपये ऍडव्हॉन्सही जमा केले. त्यानंतर पंकज अरुण मोरे नाव सांगणाऱ्या समोरील व्यक्तीने तुमची गाडी पॅक झाली असून, ती सेनेच्या ट्रकद्वारे तुमच्या घरापर्यंत पोचवण्यात येणार असल्याचे सांगत, गाडी पॅक करून लोड करतानाचे छायाचित्र मयूरला व्हॉट्‌सऍपवर टाकले. गाडी पाठवत असून, लवकरच तुम्हाला मिळणार आहे, तरी उर्वरित रक्कम ही बॅंक खात्यात जमा करण्याचे सांगितले. शंका आल्याने खातरजमा केल्यावर संबंधित व्यक्ती झाशीची (मध्य प्रदेश) असून, त्याच्याकडे महाराष्ट्र पासिंगची गाडी आली कोठून, म्हणून पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार अर्ज देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus Photo OLX Cheating Crime