Dhule Crime News : शाखाधिकाऱ्याकडून बँकेच्या लाखो रुपयांवर 'डल्ला’; गुन्हा दाखल

crime
crimeesakal

Dhule Crime News : धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चिमठाणे (ता.शिंदखेडा) येथील शाखेतून तत्कालीन शाखाधिकारी तथा रोखपाल यांनी गरीब व निरक्षर खातेदारांच्या बचत खात्यातून बनावट सह्या व अंगठा यांचा वापर करून खातेदारांच्या खात्यातून शासकीय अनुदानापोटी जमा झालेली रक्कम आणि इतर पैसे काढून घेत शासन, बँक व खातेदारांच्या एकूण ५३ लाख ९० हजार ५५८ रुपयांचा अपहार केला.(branch officer stolen 53 lakhs of rupees in bank dhule crime news)

याप्रकरणी गुरुवारी (ता.१४) शिंदखेडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमठाणे शाखेत १ एप्रिल २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत व्यवस्थापक तथा रोखपाल या पदावर एकत्रच काम केलेल्या अरुण धनराज पाटील (वय ५३, रा. निमडाळे, ता.जि.धुळे) यांनी गरीब व निरक्षर खातेदारांच्या बचत खात्यातून त्यांच्या बनावट स्वाक्षरी आणि त्यांच्या अंगठ्याचा वापर करीत खात्यातील रक्कमेचा अपहार केला होता.

याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चिमठाणे शाखेत येथे झालेल्या अपहाराची चौकशी करण्यासाठी अब्दुल अजीझ अब्दुल नबी शेख, सुभाष लक्ष्मण साबरे व कांतिलाल माधवलाल खरे यांची बँकेच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.

समितीने शासनातर्फे प्राप्त झालेल्या अनुदानाच्या रक्कम योग्यरीत्या लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा केल्या आहेत की नाही याची तपासणी केली असता त्यांना ज्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्याच्या विड्रॉल स्लिप व स्वाक्षरी तपासल्या असता बँकेत खाते उघडताना दिलेल्या सहीच्या नमुन्यांशी तफावत आढळून आली.

crime
Dhule Crime News : पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप; शिरपूर तालुक्यातील घटना

तसेच मयत खातेदारांच्या बचत खात्यातून अनुदानाचे पैसे वर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बनावट विड्रॉल स्लिप, खाते उघडतानाचे खातेदाराचे सह्यांचे नमुने, खात्यांचे तपशील, मयत इसमांचे मयत असल्याचे दाखले व त्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे काढल्याबातचा खातेउतारा असे पुरावे मिळाले.

अखेर याप्रकरणी गुरुवारी (ता.१४) शाखाधिकारी प्रभाकर पुंजू तावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन शाखाधिकारी अरुण धनराज पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
Dhule Crime News : ‘एलसीबी’चा अड्ड्यावर छापा; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com