नांदगाव- ऐन मुहूर्तावरच तिची पदवीची परीक्षाही आली. लग्न की पेपर या द्वंदात तिने आधी पेपर निवडला. लग्नाच्या स्टेजवर उभं राहण्याआधी प्रतिभाने परीक्षेचा हॉल गाठला आणि परीक्षा दिली... जवळ आलेला लग्नाचा मुहूर्त... आनंदानं भरलेल्या मनात सुरू असलेली घालमेल... बोहल्यावर वर सप्तपदी साठीच्या अक्षदा पाडण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना ती नववधूच्या साजशृंगारात मांडवातून थेट आली परीक्षा केंद्रात आणि आयुष्याच्या वळणावरील एकाच वेळी वेगवेगळ्या दोन परीक्षांना ती सामोरी गेली.