Nandurbar News : विकास आराखड्याचे दोन्ही विषय नामंजूर

Municipal Corporation Meet
Municipal Corporation Meetesakal

तळोदा : शहराच्या बहुचर्चित प्रारूप विकास आराखडा शासनास मंजुरीसाठी पाठविणे व सादर करण्यासाठी मुदतवाढीच्या प्रस्ताव मंजूर करणे या दोन्ही विषयांना शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेने एकमताने नामंजूर केले आहे.

विशेष म्हणजे नियोजन समितीने दिलेला आराखड्यावरील अहवालही सभेत मांडला गेला नाही. त्यामुळे सभेने आराखड्याबाबत शेतकऱ्यांसोबत राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यात शेतकऱ्यांनी सभेपूर्वी नगराध्यक्षांना निवेदन सादर केले. (Municipal Corporation Nandurbar Meeting Both subjects of development plan are rejected Nandurbar News)

Municipal Corporation Meet
Mohammed Rafi Birthday: त्यांच्याकडे आहे रफींच्या 20 हजार गाण्यांचा खजिना! अर्धा पगार कॅसेट अन् रेकॉर्डरसाठी!

तळोदा नगरपालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, गौरव वाणी, अमनोद्दिन शेख, रामानंद ठाकरे, भास्कर मराठे, हितेंद्र क्षत्रिय, सुरेश पाडवी, योगेश पाडवी, हेमलाल मगरे, जितेंद्र सूर्यवंशी, नगरसेविका सुनैना उदासी, बेबीबाई पाडवी, अंबिका शेंडे, अनिता परदेशी, कल्पनाबाई पाडवी, शोभा भोई, सविता पाडवी उपस्थित होते. नगरसेविका प्रतीक्षा दुबे गैरहजर होत्या.

यावेळी सभेच्या अजेंड्यावर सहा विषय होते. यात चार विषय मंजूर करण्यात आले. त्यात मागील इतिवृत्त मंजूर करणे, खानदेशी गल्लीलगत असलेले स्वच्छतागृह हटविणे, भोई गल्लीत सामाजिक सभागृह बांधणे, नगरपालिका मालकीचे ज्येष्ठ नागरिक हॉल ज्येष्ठ नागरिकांना वापरण्यासाठी खुले करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Municipal Corporation Meet
Nashik News : दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत! 2 दिवसापासून सलग दर्शन

पालिका सदस्यांची ही शेवटची सभा असल्याने नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सर्व नगरसेवकांचे व सर्व खाते प्रमुख व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक हेमलाल मगरे यांनी काही प्रभागांमध्ये विकासकामे झाले नसल्याची खंत व्यक्त केली.

सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे राजेंद्र माळी, राजेश पाडवी ,अश्विन परदेशी, मोहन माळी, सचिन पाटील, विनीत काबरा, विशाल माळी, सचिन शिरसाट यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

अहवाल बंद पाकिटातच

सभेत विकास आराखड्यावर नियोजन समितीने सादर केलेला अहवाल मांडून अहवालावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र नियोजन समितीचा अहवाल बंद पाकिटातच राहिला. आराखड्याचा विषयांना एकमताने नामंजूर केले गेल्याने अहवालात नेमके काय होते हे शेवटी गुलदस्त्यातच राहिले.

Municipal Corporation Meet
Nandurbar News : वावडी शिवारातून सागवानी लाकूड पकडले

"विशेष सभेने प्रारूप विकास आराखड्याच्या विषयांना नामंजूर केले आहे. याबाबतच्या अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर विकास आराखड्यावर पुढील कार्यवाही सुरू होईल."

सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका तळोदा

"शेतकऱ्यांनी आमच्याकडे निवेदन देत विषयांना नामंजूर करण्याची मागणी केली होती. सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांशी चर्चा करून या दोन्ही विषयांना सर्वानुमते नामंजूर केले आहे."

अजय परदेशी, नगराध्यक्ष, तळोदा

Municipal Corporation Meet
Nashik Crime News : घरफोडीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com