पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

विवेकचे आणि शंभू जाधवच्या बहिणीसोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जूनमध्ये विवकेचा शंभूच्या बहिणीसोबत केटीएचएम कॉलेजसमोर किरकोळ वाद झाला होता. याप्रकरणी शंभूच्या आईवडिलांनी विवेकविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर जाधव आणि शिंदे कुटुंबियांमध्ये समझोता झाला. मात्र, तेव्हापासूनच शंभूला विवेकबद्दल राग होता.

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा सैराटची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली. बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणातून भावाने मित्रांच्या मदतीने प्रियकर तरुणाची हत्या केली आहे. जुन्या नाशकातील डिंगरअळी, संभाजी चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. विवेक सुरेश शिंदे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून विवेकचा भाऊ रोहन सुरेश शिंदे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. सुशांत वाबळे, शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव, अशी फरार आरोपींची नावे आहेत.

असा घडला प्रकार....
विवेक सुरेश शिंदे हा मित्र ओम राजेंद्र हादगेसोबत भीशीची रक्कम गोळा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी घराबाहेर निघाला होता. दुचाकीवरुन तो रात्री १२ वाजता जुने नाशिकमार्गे घराच्या दिशेने जात असताना संशयित सुशांत वाबळे, शंभू जाधवसह दोनजणांनी त्याचा रस्ता अडवला. त्यावेळी ओम हादगेने रोहन शिंदे यास फोन करून सुशांत वाबळेने रस्ता अडवल्याची माहिती दिली. विवेकने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. परंतु संभाजी चौकाजवळील ऊर्दू शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्याला गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. विवेक गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्यास रोहने खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने विवेकला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजनकुमार सोनवणे करत आहेत.

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

बहिणीसोबत तीन वर्षांपूर्वीचो प्रेमसंबंध...पूर्ववैमनस्यातून हत्या
विवेकचे आणि शंभू जाधवच्या बहिणीसोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जूनमध्ये विवकेचा शंभूच्या बहिणीसोबत केटीएचएम कॉलेजसमोर किरकोळ वाद झाला होता. याप्रकरणी शंभूच्या आईवडिलांनी विवेकविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर जाधव आणि शिंदे कुटुंबियांमध्ये समझोता झाला. मात्र, तेव्हापासून शंभूला विवेकबद्दल राग होता, असे रोहन शिंदे यांनी तक्रारी म्हटले आहे.

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother took Revenge of Sister's love affair Nashik Crime Marathi News