Nandurbar : विखरण गावात 2 ठिकाणी घरफोडी; लाखाचा एवज लांबविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar Crime News

Nandurbar : विखरण गावात 2 ठिकाणी घरफोडी; लाखाचा एवज लांबविला

नंदुरबार : विखरण (ता. नंदुरबार) येथे एकाच रात्रीतून चोरट्यांनी (Thieves) दोन घरे फोडून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड व साडेअकरा ग्रॅम सोन्याच्या ३ अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने, (Gold Silver Jewelry) असा मुद्देमाल चोरून (Stolen) नेला. आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला असून, शेतकऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. चोरीची माहिती कळताच नंदुरबार तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्वान पथकासह पाहणी केली. मात्र, चोरट्यांचा माग दूरपर्यंत दिसून आला नाही. खरीप हंगाम जवळ आला असून, शेतीसाठी बी-बियाणे घेण्यासाठी जपून ठेवलेले पैसेच चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. (burglary at 2 places in Vikharan village Nandurbar Crime News)

बुधवारी (ता. ८) रात्री विखरण गावात चोरट्यांनी दोन घरे फोडून मुद्देमाल लंपास केला. यात वृद्ध शेतकरी आत्माराम पाटील परिवारासह घराच्या छतावर झोपले असताना, चोरट्यांनी त्याची संधी साधत घराच्या पुढील दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी पेटीत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपयांची रोकड व एक ५ ग्रॅमची अंगठी, ६ ग्रॅम, एक अर्धा ग्रॅम. अशा तीन सोन्याच्या अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने, असा मुद्देमाल चोरून नेला. चोरटे एवढ्यावरच न थांबता शेतकरी चंद्रभान विनायक पाटील यांच्याही घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाटात ठेवलेली पाच हजारांची रोकड व चांदी चोरून नेली.

गावात दोन ठिकाणी चोरी झाल्याचे सकाळी उघडकीस आले असता, गावकऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. चोरी झाल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यावरून नंदुरबार तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार व पथकासह दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला आहे. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध वरील दोन्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा: 12वीनंतर पदवी शिक्षण; पुणे विद्यापीठाच्‍या 45 हजार जागा उपलब्‍ध

"रात्री छतावर झोपलो असता, चोरट्यांनी संधी साधली. अनेक दिवसांपासून पै-पै जमा केली होती. चोरट्यांनी काही क्षणार्धात १ लाख ३० हजार रुपयांची रोकड व एक ५ ग्रॅमची अंगठी, ६ ग्रॅम, एक अर्धा ग्रॅम, अशा तीन सोन्याच्या अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी मला न्याय द्यावा." - आत्माराम पाटील, वृद्ध शेतकरी, विखरण

हेही वाचा: Nashik : पैसे परत न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या उताऱ्यावर चढणार बोझा

Web Title: Burglary At 2 Places In Vikharan Village Nandurbar Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top