Dhule Protest News : उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन; समितीचा केमिकल कंपनीला विरोध

Protesters of MIDC Sangharsh Samithi protesting by burning effigy of Industries Minister Uday Samant on chemical industry issue.
Protesters of MIDC Sangharsh Samithi protesting by burning effigy of Industries Minister Uday Samant on chemical industry issue. esakal

Dhule Protest News : नरडाणा (ता. शिंदखेडा) ‘एमआयडीसी’त उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केमिकल कंपनीला ११५ एकर जागा दिल्याच्या निषेधार्थ नरडाणा एमआयडीसी संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. ३०) मोर्चातून उद्योगमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निर्णयाचा निषेध करण्यात आला.

उद्योगमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. (Burning of symbolic effigy of Industries Minister uday samant in protest dhule news)

संघर्ष समितीच्या निवेदनाचा आशय असा : नरडाणा ‘एमआयडीसी’साठी शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. तेथे औद्योगिक विकासासह स्थानिकांना रोजगार मिळावा, असा उद्देश आहे.

परंतु, आधीच काही कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी लालसर झाले. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ‘एमआयडीसी’तील सांडपाणी तापी नदीत जाते. या नदीतून शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनासाठी पुरवठा केला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Protesters of MIDC Sangharsh Samithi protesting by burning effigy of Industries Minister Uday Samant on chemical industry issue.
Dhule Lumpy Disease : 5 किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित; जिल्ह्यातील गावांमध्ये जनावरे खरेदी-विक्रीस बंदी

केमिकल कंपनीमुळे तापी नदीचे पाणी दूषित होणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी नरडाण्यात केमिकल उद्योगांना जागा देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. तरीही उद्योगमंत्री सामंत यांनी केमिकल कंपनीला ११५ एकर जागा दिली.

त्यास विरोध असून, हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मोर्चेकरी प्रा. डॉ. रमेश खैरनार, संजीवनी शिसोदे, महावीरसिंह रावल, वंदना ईशी, देवीदास बोरसे, नथा वारुडे, किशोर रंगराव पाटील, डॉ. नितीन चौधरी, विकास पाटील, रवींद्र गिरासे, प्रवीण मोरे, संदीप कोळी, मनोज रोकडे, महेंद्र खैरनार, ईश्वरलाल परदेशी आदींनी निवेदनाद्वारे दिला.

Protesters of MIDC Sangharsh Samithi protesting by burning effigy of Industries Minister Uday Samant on chemical industry issue.
Uday Samant Update : मुख्यमंत्री पद गेले आहे हे काहीजण स्वीकारायला तयार नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com