नंदुरबार : रेडिओवरील माहितीने होणार शेतकऱ्यांना फायदा | latest Nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

रेडिओवरील माहितीने होणार शेतकऱ्यांना फायदा

नंदुरबार : कृषी विज्ञान केंद्र देशातील दहा अग्रगण्य कृषी विज्ञान केंद्रांपैकी एक आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र करीत असलेले कार्य अनुकरणीय आहे. आता रेडिओच्या माध्यमाने शेतकऱ्यांना माहिती पुरविण्याचे कार्य केंद्रामार्फत सुरु झाल्याने केंद्राने आघाडी घेतली आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले. नंदुरबार येथे कृषी विज्ञान केंद्र द्वारे संचालित रेडिओ विकास भारती कम्युनिटी रेडिओ केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

‘ओढ ज्ञानाची, जोड संस्कृतीची’ हे ब्रीद घेऊन रेडिओ विकास भारती, एफ. एम. ९०.८ या केंद्राचे उद्‌घाटन श्री. डॉ. वायुनंदन यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील होते. जिल्हाधिकारी मनिषा खत्री, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक प्रमोद पाटील, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खरबडे आदी उपस्थित होते.

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाची मान्यता मिळालेल्या या नाबार्डचा आर्थिक निधी मिळाला आहे. या केंद्राद्वारे मागासवर्गीय नंदुरबार जिल्ह्यात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, पर्यावरण, कला- क्रिडा, साहित्य, लोककला आदी राष्ट्रीय संस्कारात्मक विषयांसाठी हे रेडिओ केंद्र प्रभावी मध्यम ठरणार आहे. तर कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, हवामान अंदाज, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव या रेडिओ द्वारे शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोचविणे सोपे जाणार आहे. या केंद्राचे प्रसारणाची क्षमता १५ वायू किलोमीटर असणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे रेडिओ केंद्र माहिती साठी चांगले माध्यम ठरणार आहे.

हेही वाचा: आंबेगावच्या शेतकऱ्याने टोमॅटो पिकातून दीड महिन्यात कमावले तीन लाख

या केंद्रातील सर्व प्रसारण एका मोबाईल ॲपच्या माध्यमानेही प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या ॲपचे उद्‌घाटन यावेळी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे हस्ते करण्यात आले. तर गांडूळ खत उत्पादनावरील मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा: दीड एकरवर आधुनिक रेशीम शेती; वर्षाला 8-9 लाखांचे विक्रमी उत्पन्न

Web Title: By Agricultural Science Center The Center Has Taken Initiative To Provide Information To Farmers Through Radio In Nandubar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top