Dhule News : आरोग्य मेळाव्यांद्वारे ‘आयुष्मान भव’! धुळे जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत मोहीम

Member of Parliament present at the inauguration of Ayushman Bhava campaign. Subhash Bhamre, Collector Abhinav Goyal and other officials.
Member of Parliament present at the inauguration of Ayushman Bhava campaign. Subhash Bhamre, Collector Abhinav Goyal and other officials.esakal
Updated on

Dhule News : समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोचवून आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम धुळे जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी धुळे जिल्ह्यांतर्गत चार तालुक्यांतील स्थानिक खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक सहकार शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नेते, अधिकारी- कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्मान भव अभियानांतर्गत आरोग्य मेळावे झाले.(Campaign till Dec 31 in Dhule District Ayushman Bhava through health fairs)

कार्यक्षेत्रातील भेटीप्रसंगी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वी पर्यवेक्षण प्लान व सूक्ष्म कृती आराखडा नियोजन उत्तम रीतीने करण्यात आले आहे.

अधिकारी व कर्मचारी प्रत्येक शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी भेटी देणार आहेत.

मेळावे चांगल्या रीतीने होतील. जास्तीत जास्त लाभार्थी सहभाग घेतील याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, स्वच्छता अभियान दर शनिवारी विविध कार्यक्रमासंबंधी मेळावे घेणे, अवयवदान जनजागृती करणे, रक्तदान शिबिर घेणे, २ ऑक्टोबरला सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयुष्मान सभा आयोजित करणे, अंगणवाडी प्राथमिक शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करणे, सेवा सप्ताह साजरा करणे, सिकलसेल तपासणी, क्षयरोग तपासणी, कुष्ठरोग तपासणी, १८ वर्षांवरील सर्व पुरुषांची सर्वंकष आरोग्य तपासणी, एनसीडी कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब मधुमेह आजारावरील आरोग्य तपासणी करणे आदी कार्यक्रम घेऊन आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येत आहे.

Member of Parliament present at the inauguration of Ayushman Bhava campaign. Subhash Bhamre, Collector Abhinav Goyal and other officials.
Nashik: वर्ष वाया गेलेल्यांना प्रवेशासाठी अडचण! पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ABVPचे आंदोलन

दिशा समितीची बैठक धुळे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व आरोग्य संस्थांतर्गत एक लाख तीन हजार ९०५ नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यात आली.

आयुष्मान भव मोहिमेंतर्गत अवयवदानाची दिशा समितीच्या बैठकीत शपथ घेण्यात आली.

सभेला खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एन. देगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल, सहाय्यक जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संजय मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमिता आठवले, सीपीएचसी कन्सल्टंट कृष्णाली शिंदे, सर्व तालुका आरोग्याधिकारी व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

एनएचएने नॅशनल ऑर्गन अॅड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO)साठी अवयवदान प्रतिज्ञा नोंदणी विकसित केली आहे.

सर्वसामान्य नागरिकदेखील अवयवदान प्रतिज्ञा नोंदविण्यासाठी http://notto.abdm.gov.in या लिंकचा वापर करू शकतात.

Member of Parliament present at the inauguration of Ayushman Bhava campaign. Subhash Bhamre, Collector Abhinav Goyal and other officials.
Nashik Neo Metro: टायर बेस मेट्रो निओ प्रकल्पासाठी ‘तारीख पे तारीख’! नारळही न फुटल्याने मृगजळाची अनुभूती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.