video : प्रचारासाठी उमेदवारच शेताच्या बांधावर! 

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या बंधावर जाण्याची वेळ आली आहे.

मनमाड : सध्या खरिपाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या बंधावर जाण्याची वेळ आली आहे. 

खरिपाची काढणी अन्‌ रब्बीच्या तयारीत बळीराजा व्यस्त 
पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरीप हंगामालाही उशीर झाला. खरिपाची पिके जोमात असताना पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिके वाढीला लागताच पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार आहे. सध्या बाजरी, सोयाबीन, मूग, मका कापणीला सुरवात झाली आहे. रिकाम्या झालेल्या क्षेत्रात त्वरित रब्बीची पेरणी सुरू झाली असून, शेतकरी मशागतीला लागले आहेत. मका कापणीला अद्यापही वेळ आहे. सध्या जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत आहे. त्याचा लाभ रब्बी पेरणीला होणार आहे. सध्या जमिनीत खोलवर ओल असल्याने पेरलेले उगवण्याची पूर्णपणे खात्री झाली आहे. अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरणीसोबत कांदालागवड करण्यात येणार असल्याने जिल्ह्यात मशागत चालू आहे.

कार्यकर्ते प्रचाराला उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांचे तोंडचे पाणी पळाले

रब्बीचा हंगाम सुरू झाला तसा सध्या निवडणुकीचाही हंगाम सुरू झाला आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे, रुसवे- फुगवे काढणे, शहरात, गावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, बंडाळीला शांत करणे, जनतेपुढे कोणते मुद्दे सांगायचे, केलेल्या कामांची यादी तयार करणे, भेटीगाठी, प्रचार यात सध्या उमेदवार मग्न आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते प्रचाराला उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांचे तोंडचे पाणी पळाले आहे. रणधुमाळी सुरू झाली तरी शेतकरी शेतीकामात मग्न आहेत. त्यामुळे बळीराजाला भेटण्यासाठी उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीत शेतकरी गुंतला आहे. गावात कोणीच मिळत नसल्याने उमेदवाराला प्रचारासाठी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडे मत मागावे लागत आ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates for campaigning on the farm