डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'कँडल मार्च!'

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे "कँडल मार्च"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंर दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरून कँडल मार्च काढण्यात आला. रॅलीत भीमसैनिकांसह समाजबांधव व स्त्रिया पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित जागी निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील आदींनी तथागत गौतम बुद्ध व डॉ.आंबेडकरांच्या मूर्तींचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. शीतल जाधव, श्वेता जाधव यांनी त्रिसरण, पंचशील, बुद्धवंदना सादर केली. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे निजामपूर शहराध्यक्ष बबलू सय्यद यांनी भीमसैनिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती भेट दिली.

शेवटी दोन मिनिटे मौन पाळून महामानवास आदरांजली वाहण्यात आली. प्रा. भगवान जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविराज जाधव, सिद्धार्थ जगदेव, नामदेव पिंपळे, बबलू सय्यद, अफजल पठाण, समीर लोहार, शैलेंद्र जाधव, राहुल महिरे, शोभाबाई पवार, हर्षाली मोहिते, सिद्धार्थ जाधव, अशोक पिंपळे, सुनील जाधव, छोटू जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान जैताणे ग्रामपंचायत सभागृहातही महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार, ग्रामपंचायत सदस्य शानाभाऊ बच्छाव, गणेश देवरे, दौलत जाधव, पंढरीनाथ सोनवणे, गणेश पगारे, लिपिक यादव भदाणे आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Web Title: Candle March On the occasion of Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana