राष्ट्रपतींच्या हस्ते कॅट्सला 'प्रेसिंडेट कलर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व कौशल्याने कॉर्प्सचे पायलटने कामगिरी बजावली आहे. अशा शब्दात लष्कराचे सुप्रीम कमांडर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील आर्मी एव्हीएशनच्या 
कामगिरीचा गौरव केला. 

नाशिक : आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व कौशल्याने कॉर्प्सचे पायलटने कामगिरी बजावली आहे. अशा शब्दात लष्कराचे सुप्रीम कमांडर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील आर्मी एव्हीएशनच्या 
कामगिरीचा गौरव केला. 

कॅट्सला प्रेसिंडेट कलर

कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशन (कॅट)च्या तळावर विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) कॅटला गौरविण्यात आले. 
राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत (पीव्हीएसएम, एव्हीएसएम), आर्मी एव्हीएशनचे महानिर्देशक लेफ्टनंट जनरल कवंलकुमार,आदींसह लष्करी 
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग सेंटर कॅटच्या ध्वज प्रदान (प्रेसिडेंट कलर) सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत कॅटला मिळालेल्या ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. सर्व धर्मातील धर्मगुरूंच्या हस्ते पूजा संस्कार पंडित, मौलाना, फादर, गुरुद्वारा प्रबंध समितीच्या प्रमुखाकडून पूजनानंतर कॅट लष्करी तळाच्या स्वाधीन त्यांचा ध्वज सूपूर्द करण्यात आला. 

शानदार संचलन 
तत्पूर्वी, लष्करी परंपरेनुसार झालेल्या या कार्यक्रमात आर्मी एव्हीएशनचे कमांडट ब्रिगेडियर सरबजीत सिंह बावा भल्ला यांच्या नेतृत्वाखाली नियोजन झाले. राष्ट्रपतीच्या हस्ते हे ध्वज देउन सन्मान करण्याच्या प्रक्रियेला "प्रेसिडेंट कलर' म्हटलं जाते 1 नोव्हेंबर 1984 ला स्थापन झालेल्या तोपखान्यातील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन (कॅट)ने 32 वर्षाच्या कारकिर्दीत ऑपरेसहन विजय, मेघदूतसह जगातील सर्वाधीक खडतर बर्फाळ सियाचीनच्या खडतर व उंच युद्धभूमी आणि कच्चं वाळवंटात उपयुक्तकता सिध्द केली त्याची दखल घेत, आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उल्लेख करीत, कॅटकडे ध्वज सूर्पूद करीत, कॅटला स्वतंत्र ओळख दिली. ब्रिगेडियर सरबजित सिंह यांनी संचलनाचे नेतृत्व केले. कॅटच्या भात्यातील चेतक, चित्ता,ध्रूव आणि रुद्र तर्फे राष्ट्रपतींना सलामी देण्यात आली. 

कॅटच्या कामगिरीची दखल 
राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, कॅटने ३२ वर्षाच्या वाटचालीत साहस, शौर्य, गौरव, किर्तीचा परिचय दिला आहे. विशेषत: १९८६ च्या श्रीलंकेतील ऑपरेशन पवन, १९८४ मध्ये सियाचीन सारख्या 20 हजार फूट उंचीवरील खडतर बर्फाळ रणांगणावर ऑपरेशन मेघदूतच्या माध्यमातून सर्वश्रेष्ट कामगिरी साध्य केली. त्यात, कॅटच्या वैमानिकांनी नियमित उड्डाणातून सर्वोत्तर सर्वश्रेष्ठतेची अनुभुती दिली. "हवाई सैनिक' असा कॅटच्या जवानांचा उल्लेख करतांना, राष्ट्रपतीनी कॅटची कामगिरीचे कौतुक करतांना त्यांनी, आर्मी एव्हिएशनच्या शहीद जवानांचे रक्त आणि त्याग यामुळे कॅटला सार्वभौमत्व प्राप्त झाले आणि देशाचा गौरव केला. त्यांनी ही संधी सर्व दिग्गजांना आणि सेवा देणाऱ्या सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी केली कर्तव्य आणि व्यावसायिक आचरणासाठी सर्वात अतिशय खडतर प्रदेशात क्षमता सिध्द केली आहे. 

शौर्याचा रोड मॉडेल म्हणून गौरव 
राष्ट्रपती कोविंद यांनी, गेल्या वर्षी १० मे च्या त्यांच्या सियाचीन येथील कुमार पोस्टच्या भेटीचा संदर्भ देतांना, सांगितले की, जवान तिथे सर्वात प्रतिकूल परिस्थितीत राहतात हिमनदीच्या साक्षीने जगातील सर्वाधीक उंच व खडतर युध्दभूमीवर भारतीय लष्कराने व कॉप्सने त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष दिली आहे. जवानांचा दृढनिश्‍चय,दक्षता आणि या शूर सैनिकांच्या बलिदानांमुळेच आम्ही शांतीने राहतो हे माझ्या भेटीत जाणवलं. आर्मी एव्हिएशन कोर्प्सने 33 सन्मान व पुरस्कार मिळवले आहेत. 1999 च्या 
कारगिल मधील ऑपरेशन विजय मध्ये अनेक पथकांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिटतर्फे गौरविले. विदेशात काम करताना सोमालिया आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो सारख्या देशांत संयुक्त राष्ट्राच्या शांती मशीनवर, नैसर्गिक आपत्तीत चांगली कामगिरी केली आहे. आर्मी एव्हिएशन कोर्प्सच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत राष्ट्रपतीनी त्यांचे रक्त आणि त्यागामुळेच आम्हाला सार्वभौमत्व सुरक्षित केले आहे. शौर्य आणि विशिष्ट सेवेसाठी कॉर्प्सच्या शौर्याची कामगिरी मॉडेल आहे. त्यामुळेच आर्मी एव्हिएशनच्या भारतीय सैन्याचा राष्ट्राला अभिमान आहे. अशा शब्दात गौरव केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cats received president color by the president