
नंदुरबार : नाताळनिमित्त येथील ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंद व उत्साह निर्माण झाला असून रविवारी (ता.२५) पासून सुरू होणाऱ्या ख्रिसमसच्या आनंदपर्वणीनिमित्त सुवार्ता अलायन्सतर्फे आठवडाभर धार्मिक प्रार्थना, प्रवचने, भगवान येशूचे संदेश, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
नाताळनिमित्त सकाळी नऊला फ्रॅंकलीन चर्चमध्ये सकाळी सहा ते दुपारी दहा दरम्यान, चर्चमध्ये प्रार्थना व संदेश आणि मार्गदर्शन असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सायंकाळी संडे स्कूल कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.२६) नाताळ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. (Celebrate Christmas Natal happily in Nandurbar Nandurbar News)
तर मंगळवारी पुन्हा संडे स्कूलचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी महिला मंडळासाठी फन गेम तर गुरुवारी प्रीती भोजन व युवकांसाठी संडे स्कूलचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी आनंद मेळावा, त्यानंतर नववर्ष भक्ती कार्यक्रम होणार आहेत.
त्यासह मूकबधिर विद्यालयात फराळ वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच, रात्री गीत गायन व संगीत रजनी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी विशेष मनोरंजन कार्यक्रम होणार आहे. एकंदरीतच नाळ उद्या असले तरी २१ डिसेंबरपासूनच नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरवात झाली आहे.
येथील मिशन संस्थेचा शाळेत विविध मान्यवरांचा उपस्थितीत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वर्षभरातून येणारा नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांसाठी आनंद पर्वणी ठरली आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजनासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात आबालवृद्धांनी सहभागी होऊन कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. संस्थेचे श्री. पठारे, राजेश वळवी, डॉ. राजेश वसावे, संस्थेच्या संचालक तथा प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पदार्थांची मेजवानी
सण-उत्सव असला म्हणजे प्रत्येकाचा चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येतो. प्रत्येकाचा अंगात नवीन कपडे, घरात गोड-धोड पदार्थांची मेजवानी, आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन, एकमेकांना शुभेच्छांचा वर्षाव, आठवडाभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यामुळे शहरातील ख्रिस्ती बांधवांचा चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.