ईडीची पीडा मागे लागूनही भुजबळांच्या संपत्तीत वाढच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

वाढत गेली संपत्ती...
२००४ मध्ये भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढविली. त्या वेळी दिलेल्या शपथपत्रात स्वत: व पत्नी मीनाताई यांच्या नावावर जवळपास १  कोटी ९१ लाखांची संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते. भुजबळांकडे त्या वेळी एकही वाहन नव्हते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांची मालमत्ता ७ कोटी ७५ लाख होती. 

येवला - येथून २००४ मध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यावेळी १.९१ कोटीची संपत्तीचे मालक असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी सुमारे २४ कोटींच्या मालमतेचे मालक आहेत. त्यांच्याकडे सध्याच्या बाजारमूल्यानुसार विविध प्लॉट, फ्लॅट यासह एकूण मालमत्ता १० कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये असून पत्नी मीना यांच्याकडे १३ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता आहे. ईडीने कितीही मालमता जप्त केली असली तरी आजही त्यांची संपत्ती वाढलेली दिसत आहे.

२०१४ ते २०१९ या काळात भुजबळ यांची आपली मालमत्ता कितीतरी कोटींनी वाढली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात याचे विवरण नमूद केले आहे.
भुजबळांकडे हातात रोख रक्कम फक्त १ लाख ३ हजार तर पत्नीकडे ५१ हजार ७०० रुपये आहे.

त्यांच्या चार बँकांमध्ये अनुक्रमे १२ लाख ६६ रुपये,२ लाख ९ हजार रुपये, २ लाख ९ हजार आणि २ लाख ९ हजार ३८० रुपये ठेवी असून बँकेतील एकूण ठेवी ४६ लाख २० हजार तर पत्नीकडे दोन बँकांमध्ये अनुक्रमे ५ लाख ८९ हजार व १ लाख ६४ हजार रुपये आहेत. तर बाँड्स, शेअर्स स्वतःच्या नावे १ लाख ६२ हजार व  पत्नीकडे २५ लाख २५ हजार रुपये असून सोने २१ लाखांचे आहेत. इतर ठेवींसह एकूण जंगम मालमत्ता १ कोटी १ लाख २५  हजार तर पत्नीच्या नावे १ कोटी ६५ लाख रुपयांची आहेत.भुजबळ पती-पत्नीच्या नावे माझगाव,नाशिकमध्ये भुजबळ फार्म, भायखळा, वाशी तसेच नाशकात पुना रोड या ठिकाणी प्लॉट, प्लॅट तर दिंडोरीत जमीन, ट्रॅक्टर आहेत.

स्थावर मालमत्तेत सध्याच्या बाजारमूल्यानुसार विविध प्लॉट, फ्लॅट यासह एकूण मालमत्ता १० कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये व पत्नीकडे १३ कोटी ८८ लाख रुपये आहेत. तर त्यांच्यावर ३८ लाख २४ हजाराचे कर्ज देखील आहेत.

वाढत गेली संपत्ती...
२००४ मध्ये भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढविली. त्या वेळी दिलेल्या शपथपत्रात स्वत: व पत्नी मीनाताई यांच्या नावावर जवळपास १  कोटी ९१ लाखांची संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते. भुजबळांकडे त्या वेळी एकही वाहन नव्हते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांची मालमत्ता ७ कोटी ७५ लाख होती. 
२०१४ च्या शपथपत्रातील माहितीनुसार, भुजबळांच्या नावे ८ लाख तर पत्नीच्या नावे २४ लाखांचे कर्ज होते.त्यावेळी भुजबळांकडे २ लाख ८७ हजार रुपयांचा ट्रॅक्टर तर पत्नीच्या नावावर ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे टाटा पिकअप वाहन आहे.२००४ मध्ये त्यांच्याकडे ५ लाख रुपयांचे तर २०१४ मध्ये पत्नीकडे ३५ लाख तर स्वत: भुजबळ यांच्याकडे १६ लाखांचे सोने होते.

संपत्ती अशी...
2004 - 1.91 कोटी 
2009 - 7.75 कोटी 
2014 - 21 कोटी
2019 - 24 कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chagan Bhujbal asset increase for contest Maharashtra Vidhan Sabha 2019