साक्री- शेतकऱ्यांना साक्री बाजार समितीतर्फे मुलभूत सुविधा पुरवण्यात येतील. खास बाब म्हणून कांदा खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांना कोणताही कर लावला जाणार नाही. कोणतीही छुपे कर कपात केली जाणार नाही. हमाली, मापाई, तोलाई लावली जाणार नाही. शेतकऱ्यांनी कांदा सरकारी बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा, व्यापाऱ्यांकडून रोखीने पैसे दिले जातील, अशी ग्वाही सभापती डॉ. बन्सीलाल बाविस्कर यांनी दिली.