Crime
sakal
चाळीसगाव: जन्मदात्या वृद्ध आईवडिलांना मुलाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तालुक्यातील हिरापूर येथे शनिवारी (ता. २०) झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मारहाण करणारा हेमंत लहू काळे (रा. जुना आडगाव नाका, नाशिक) याला नाशिकमधून अटक केली. मात्र, मारहाणीचे कारण समजून आले नाही.