चाळीसगाव- येथील पालिकेने २०२४-२५ व २०२५-२६ साठी सुधारित अंदाजपत्रक सादर करताना २८८ कोटी ३८ लाख २२ हजार ६३४ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवले आहे. यात २८८ कोटी २४ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च वजा जाता आगामी वर्षासाठी १३ लाख २७ हजार ६३४ रुपये शिल्लक दाखविले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सौरभ जोशी यांनी या शिलकी अंदाजपत्रकाला नुकतीच मान्यता दिली.