नंदुरबार- वयाच्या २८ व्या वर्षापासून हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष ७५ वर्षे उलटल्यानंतरही सुरूच आहे़. यासाठी जिल्हा न्यायालय, उच्च व सर्वोच्च न्यायालय, जिल्हा प्रशासन साऱ्यांनीच धामडोद येथील चंदनबाई लोटनसिंग गिरासे यांच्या बाजूने निकाल दिला असतानाही नंदुरबार तालुका पोलिसांच्या उदासीनतेमुळे हक्काच्या जमिनीचा ताबा मिळाला नाही़.