लग्नाच्या १५ दिवसानंतर नववधूने केले 'हे' काम...वराचे उडाले 'होश'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

विवाहानंतर १५ दिवसांनी घरात कोणीच नसल्याचे बघून नववधू सारिका ही सोन्याचे दागिने घेऊन फरारी झाली. भावसार कुटुंबीय तिला शोधण्यासाठी गेले असता, बालाजीनगर येथील घरी सारिका भेटली. मात्र तिने त्यांच्यासोबत येण्यास नकार देत खोटे आरोप करून गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. सारिका हिचेबाबत लग्न जमविणाऱ्या मध्यस्थांकडून माहिती घेतली असता, यापूर्वी बरेच लग्न करून फसवणूक केल्याची माहिती मिळाली व आमचीही फसवणूक झाली असल्याचे देवीदास भावसार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

नाशिक : पैसे घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या नवरीसह दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. चार लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील नवरीसह दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. ८) अटक केली होती. विवाहानंतर १५ दिवसांनी घरात कोणीच नसल्याचे बघून नववधू  सोन्याचे दागिने घेऊन फरारी झाली. देवीदास भावसार (रा. नांदगाव) यांनी याबाबत पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. 

झाले असे की...
देवीदास भावसार यांचे पुत्र अमोल यांच्यासाठी गोरख छल्लारे यांना मुलगी शोधण्यास सांगितले. छल्लारे यांनी औरंगाबाद येथील सारिका चव्हाण या मुलीचे स्थळ आहे, असे सांगितले. मात्र लग्नापूर्वी काही रक्कम द्यावी लागेल, असे ठरल्यानंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम रमेश यशवंते, मनीषा उंडे (रा. बालाजीनगर, औरंगाबाद) यांच्या उपस्थितीत सारिका चव्हाण हिच्यासोबत नांदगाव येथे छल्लारे यांच्या घरात झाला. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार मुलगा अमोल याच्या खात्यावरून रमेश यशवंते यांच्या बॅंक खात्यावर एक लाख ९८ हजार रुपये, मनीषा उंडे यांच्या खातेवर ४६ हजार रुपये, तर लग्नातील भोजन व्यवस्थेसाठी ३३ हजार रुपये साई प्रतीक भोजनालयाच्या खात्यावर, असे एकूण दोन लाख ७७ हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर ९ डिसेंबर २०१८ ला गोरख छल्लारे यांच्या घरी मनीषा उंडे व रमेश यशवंते यांना नवरी मुलगी सारिका हिच्या नातेवाइकांना देण्यासाठी रोख एक लाख ५० हजार रुपये दिले होते. ठरल्याप्रमाणे २२ डिसेंबर २०१८ ला चांदवड येथील एका मंदिरात वैदिक पद्धतीने अमोल भावसार व सारिका चव्हाण यांचा विवाह सोहळा झाला. स्त्रीधन म्हणून नवरी सारिकाला अंगावर ५० हजार रुपयांचे दोन तोळे सोन्याचे दागिने घालण्यात आले होते. 

लग्नाच्या आमिषाने फसवणूक
विवाहानंतर १५ दिवसांनी घरात कोणीच नसल्याचे बघून नववधू सारिका ही सोन्याचे दागिने घेऊन फरारी झाली. भावसार कुटुंबीय तिला शोधण्यासाठी गेले असता, बालाजीनगर येथील घरी सारिका भेटली. मात्र तिने त्यांच्यासोबत येण्यास नकार देत खोटे आरोप करून गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. सारिका हिचेबाबत लग्न जमविणाऱ्या मध्यस्थांकडून माहिती घेतली असता, यापूर्वी बरेच लग्न करून फसवणूक केल्याची माहिती मिळाली व आमचीही फसवणूक झाली असल्याचे देवीदास भावसार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

नवरीसह दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी 

त्यानंतर रमेश यशवंते, मनीषा उंडे, सारिका चव्हाण (रा. बालाजीनगर, औरंगाबाद) यांच्याविरोधात चार लाख 77 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा 20 सप्टेंबर 2019 ला दाखल केला होता. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस हवालदार राजू मोरे यांनी केल्यानंतर संशयिताना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating case of bride at Nashik News Crime News