Marriage Fraud
esakal
छत्रपती संभाजीनगर : मुलगी पाहिली, पसंत पडली. शेतकरी तरुणाचा आनंद गगनात मावेनासा झाला. कोर्ट मॅरेज करायचे ठरले. ठरल्यानुसार रक्कम देऊन कोर्ट मॅरेजही (Marriage Fraud) केले. यानंतर शहराबाहेर पडताच चहा पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात सिनेस्टाइलने पांढऱ्या रंगाची कार आली आणि नववधू त्याच्या हाताला झटका देऊन त्या कारने निघून गेली. काही क्षणांतच शेतकरी तरुणाच्या स्वप्नांचा चुराडा झाला.