Crime
sakal
चिमठाणे: वरझडी (ता. शिंदखेडा) गावात जुन्या भांडणाच्या रागातून मंगळवारी (ता. ६) सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास दोन गटांत धुमश्चक्री झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका गटातील गुन्ह्यात नऊ पैकी सात संशयितांना अटक केली. दोन संशयित फरारी झाले आहेत. त्या संशयितांना बुधवारी (ता. ७) शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता, शुक्रवार (ता. ९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.