'चोपडा अर्बन'च्या अधिकाऱ्यांना दमानियांवरील गुन्ह्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

जळगाव - बनावट डीडी व चेक बनवून माजी मंत्री एकनाथ खडसेंवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांवर मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात चौकशीअंती आज चोपडा अर्बन बॅंकेचे व्यवस्थापक, रोखपाल व वसुली अधिकारी अशा तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली.

या गुन्ह्यात दमानिया यांच्यासह सहा संशयित आहेत. पहिल्याच अटक सत्रात बॅंक अधिकाऱ्यांचा नंबर लागला असून, चौकशीअंती इतरांनाही अटक होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

माजी मंत्री खडसेंनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत दमानिया यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. मात्र, ही कागदपत्रे, बॅंकेचे डीडी बनावट असल्याचा दावा करत खडसे यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला. त्यानुसार गेल्याच आठवड्यात दमानिया व गजानन मालपुरेंसह सहा संशयितांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपड्यातून तिघांना अटक
खडसे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात बॅंकेतून बाहेर पडलेले कोट्यवधीचे डी. डी. आणि चेक याबाबत माहिती व जबाब घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा अर्बन बॅंकेचे व्यवस्थापक अविनाश भालचंद्र पाटील (वय 45), रोखापाल योगेश काशिनाथ बऱ्हाटे (वय 40) आणि किशोर लक्ष्मण अत्तरदे (वय 47) अशा तिघांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीत तिघांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि तपासाला सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांनी आज सायंकाळी तिघांना रीतसर अटक केल्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chopada arban bank officer arrested crime