धुळे- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. २९) शहरातील बाजारपेठेत गर्दी झाली. सोन्याच्या बाजारातही उत्साह आहे. बाजारपेठेत आंब्याची मागणी व आवकही वाढली आहे. घागरींनीही बाजारपेठ सज्ज आहे. .दिवसभर उन्हामुळे नागरिक सायंकाळनंतर खरेदीसाठी बाहेर पडले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत मोठी दुकाने सुरू होती. सणाचे औचित्य साधत काही व्यावसायिक, विक्रेत्यांनीही विविध सवलती व आकर्षक ऑफर जाहीर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला..पारंपरिक वस्त्र, दागदागिने, सोने-चांदीची खरेदी, तसेच घरगुती उपयोगाच्या वस्तूंसाठी नागरिकांनी बाजारात मोठी उपस्थिती दर्शवली. अक्षयतृतीया या सणास शुभकारक व मंगलमय मानले जाते. त्यामुळे या दिवशी नवीन वस्त्र, दागदागिने, वाहन किंवा घर खरेदी करण्यास विशेष महत्त्व दिले जाते. सराफा दुकाने, वस्त्रालये, तसेच इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये ग्राहकांची झुंबड दिसली. सोने व चांदीच्या दरात स्थिरता असल्यानेही नागरिक मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करत आहेत..विविध खरेदीवर भरखानदेशात या सणाला ‘आखाजी’ असे म्हटले जाते. हा सण साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी घागरी भरण्याची प्रथा आहे. घरोघरी पूर्वजांच्या स्मृतीनिमित्त घागर भरली जाते. तसेच आंब्याचा रस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात मातीच्या घागरी दाखल झाल्या आहेत. .घागरीवर आंबा, डांगर ठेऊन पूजन केले जाते. अक्षयतृतीया सण वैशाखातील रणरणत्या उन्हात नवे चैतन्य घेऊन येतो. या दिवशी खरेदी केलेली वस्तू अक्षय्य राहते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तामध्ये स्थान आहे. या दिवशी ग्राहकांचा विविध वस्तू, प्लॉट, घर घेण्यावर भर असतो..घागरींचे दर यंदा स्थिरबाजारात अहमदाबाद (गुजरात), सेंधवा (मध्य प्रदेश) येथील विक्रेत्यांसह स्थानिक सोनगीर, कुसुंबा (ता. धुळे) येथील घागर विक्रेते दाखल झाले आहेत. स्थानिक कारागिरांच्या तुलनेत परप्रांतातून मोठ्या प्रमाणात माठ व घागरींची निर्यात झाली आहे. .स्थानिक कारागीर हे पारंपरिक पद्धतीने हाताने तर परप्रांतीय विक्रेते मशीनच्या सहाय्याने माठ व घागरी तयार करतात. बाजारात घागर ७० ते १०० रुपयांना तर माठ २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बुधवारपर्यंत पाऊणलाख घागरींची विक्री होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. यंदा माठ व घागरींच्या किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले..सराफा बाजारात गर्दीशहरातील आग्रा रोडवरील सराफा बाजारात मंगळवारी सायंकाळपासून ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसले. यात सोन्याचा (२४ कॅरेट) दर ९५ हजार ९००, तर २२ कॅरेटचा दर ८७ हजार ८४० रुपये (प्रति १० ग्रॅम) राहिला. चांदीच्या दरात ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसत असले, तरी दर प्रतिकिलो ९८ हजार २०० राहिला. ग्राहकांनी दुचाकी व चारचाकींची नोंदणी (बुकिंग) केली आहे. या मुहूर्तावर वाहने खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. शिवाय, फ्लॅट, घरकुल खरेदीही याच मुहूर्तावर करण्याकडे अनेकांचा कल असतो. तो यंदाही आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.