

Nandurbar News : छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीच्या उद्घाटनानिमित्त शनिवारी (ता. २२) पंडित प्रदीप मिश्रा, तर इमारतीच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शहरात येणार आहेत. (CM and Deputy Chief Minister will be present for inauguration of Chhatrapati hospital on 22 april nandurbar news)
त्यानिमित्त धुळे चौफुली ते शहादा रस्त्यावरील गर्दीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करीत ती इतर मार्गांवरून वळविली आहे.
येथील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व परिवारातर्फे १२५ बेडचे छत्रपती मल्टिस्पशालिटी हॉस्पिट उभारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा अक्षयतृतीयेस होत आहे. त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा येणार आहेत. त्यांच्या उपस्थित चार तासांचे शिवपुराण कथेचे निरूपण होणार आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्रीपासून तर शनिवारी (ता. २२) सायंकाळी सहापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
अशी असेल वाहतूक
-दोंडाईचाकडून येणारी लहान-मोठी वाहने चौपाळे फाट्याकडून चौपाळे गावातून उमर्दे रस्ता ओलांडून होळतर्फे हवेलीमार्गे शहराबाहेरील उड्डाणपुलाखालून थेट करण चौफुलीकडे जाईल.
-साक्री-नवापूरकडून येणारी व शहादा किंवा गुजरातकडे जाणारी वाहने ढेकवद येथून पाचोराबारी, करणखेडा, वाका चार रस्तामार्गे शहादा, गुजरातकडे जातील.
-करण चौफुलीकडून येणारी वाहने शहराबाहेरील उड्डाणपुलाखालून होळतर्फे हवेली गावावरून उमर्दे रस्ता ओलांडून चौपाळे गावातून थेट फाट्यावरून दोंडाईचा-धुळे रस्त्यावर येतील. तेथून दोंडाईचा-धुळ्याकडे जातील, तर नवापूरकडे जाणारी वाहने धुळे चौफुलीवरून नवापूर चौफुलीकडून पुढे जातील.
-प्रकाशा चौफुलीकडून येणारी वाहने शहादा-दोंडाईचामार्गे धुळे व इतर पुढील मार्गावर जाऊ शकतील.
-वाका चार रस्ताकडून येणारी वाहने वाका चार रस्ता ते सरळ प्रकशामार्गे शहाद्याकडे जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.