Jalaj Sharma | ‘MIDC’तील अतिक्रमणे हटवा, कामे मार्गी लावा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Collector Jalaj Sharma
Collector Jalaj Sharmaesakal

धुळे : धुळे औद्योगिक विकास महामंडळाने महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित कामे त्वरित मार्गी लावावीत, तसेच औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण निर्मूलनासाठी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी दिल्या. (Collector Jalaj Sharma gave instructions to remove encroachments in MIDC and get works on track dhule news)

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी (ता. २) सकाळी जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी. एस. सरोदे, कार्यकारी अभियंता एम. एस. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे,

उद्योगनगर औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष आशिष पाटील, खानदेश औद्योगिक विकास परिषदेचे नितीन बंग, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, संचालक सुभाष कांकरिया, उपाध्यक्ष वर्धमान सिंगवी, धुळे-अवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देवरे, खानदेश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनकडून सचिव भरत अग्रवाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी कामांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगांना पायाभूत सोयी-सुविधांची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले पाहिजेत. औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण निर्मूलनासाठी मोहीम राबवावी. त्यासाठी तातडीने कामे मार्गी लावावीत.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Collector Jalaj Sharma
Clean Survey Scheme : स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर सज्ज; सार्वजनिक भिंतींचे सुशोभीकरण

औद्योगिक वसाहतीला पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने उपाययोजना हाती घ्याव्यात. अक्कलपाडा प्रकल्पावर आधारित योजनेला गती द्यावी. नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता थेट महामार्गाला जोडण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

तसेच उद्योगमित्र समितीची दरमहा बैठक आयोजित करून अनुपालन अहवाल सादर करावा. औद्योगिक वसाहतीने अतिक्रमण हटविण्याबाबत कार्यवाही करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.

उपाययोजना सुरू

उद्योजकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक सरोदे यांनी बैठकीत सांगितले. कार्यकारी अभियंता पाटील यांनी औद्योगिक वसाहतीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

तसेच औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण निर्मूलनासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. उद्योग संघटनांचे श्री. पाटील, श्री. बंग, श्री. कुलकर्णी, श्री. कांकरिया, श्री. सिंगवी, श्री. देवरे, श्री. अग्रवाल आदींनी विविध सूचना, प्रश्न मांडत ते सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Collector Jalaj Sharma
Onion Agitation : कांदा प्रश्नी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे चांदवडला उपोषण सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com