Latest Marathi News | बोगस डॉक्टर कारवाई अहवाल सादर करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

collector Jalaj Sharma

Dhule News | बोगस डॉक्टर कारवाई अहवाल सादर करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यवाही करावी व आरोग्य यंत्रणेने त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली. (Collector Jalaj Sharma Submit a bogus doctor action Report Dhule News)

हेही वाचा: Jalgaon News : जमीनच फाटलीय.. कुठं कुठं करणार पॅचवर्क?

जिल्हाधिकारी शर्मा अध्यक्षस्थानी होते. अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कंचन वानेरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त के. एस. देशमुख, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲड. चंद्रकांत येशीराव, सर्व तालुका आरोग्याधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करणे ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी शासनाने गठित केलेल्या तालुकास्तरीय समितीमार्फत विशेष मोहीम राबवावी. आवश्यक तेथे पोलिस दल व अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेऊन सांघिकपणे काम करावे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Jalgaon News : नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या; राहत्या घरातच घेतला गळफास

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची सुधारित यादी तयार करून पुढील १५ दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच काही संवेदनशील भागात बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष कृती दल गठित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

नागरिकांनीही आपल्या परिसरात असे बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्यास जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडे तपशील देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक असल्यास ती उपलब्ध करून देण्यात येईल, असे अपर पोलिस अधीक्षक काळे यांनी सांगितले. बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिमेबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नवले यांनी दिली. डॉ. सूर्यवंशी, ॲड. येशीराव यांनी चर्चेत सहभाग घेतला.

हेही वाचा: Jalgaon News : गावठाणापासून 200 मीटर आतील जमिनीस बिनशेतीची गरज नाही : अमन मित्तल