स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आता "ऑनलाइन' 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आता "ऑनलाइन' 

जळगाव - शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांकडे युवकांचा कल सध्या वाढला आहे. मात्र, परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खासगी क्‍लासेसची फी ही विद्यार्थ्यांना परवडणारी नसते. त्यामुळे जिल्ह्यातील चार उच्चशिक्षित तरुणांनी मिळून "मिशन एमपीएससी डॉट कॉम' हे शैक्षणिक पोर्टल सुरू केले असून, या माध्यमातून लाखो विद्यार्थी आता "ऑनलाइन' मोफत अभ्यास करू लागले आहेत. 

"मिशन एमपीएससी' हे एक शैक्षणिक स्टार्टअप असून, याची सुरवात 2014 मध्ये ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून करण्यात आली. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांची तयारी करून शासकीय अधिकारी होण्याची स्वप्न रंगविणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना याद्वारे मार्गदर्शन मिळते. यात प्रामुख्याने महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात एमपीएससीसह एसटीआय, पीएसआय, असिस्टंट, पोलिस भरती व अन्य परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी ऑनलाइन करू शकतात. यावर राज्यातले अनेक अधिकारी, लेखक, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ नियमित लेखन करीत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अगदी तीन वर्षांत "मिशन एमपीएससी' हे पोर्टल महाराष्ट्रातले सर्वाधिक पाहिले जाणारे शैक्षणिक पोर्टल ठरले आहे. हे पोर्टल तुषार भामरे, युवराजसिंग परदेशी, सौरभ पुराणिक, रजत भोळे यांनी मिळून तयार केले आहे. 

दररोजचे अपडेट 
या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी दररोज आवश्‍यक असणाऱ्या घडामोडींचे अपडेट्‌स टाकले जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. यासोबतच पोर्टलवर अधिकाऱ्यांच्या यशोगाथादेखील वाचायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळत आहे. 

तीन वर्षांत... 

11 लाख  - लाभ घेतलेले नोंदणीकृत विद्यार्थी 
1, 02, 233 - फेसबुक पेज यूजर्स 
2,037 - ट्विटर यूजर्स 
500 - परदेशातील फॉलोअर्स 
3,244  - इन्स्टाग्राम यूजर्स 
24,244 - टेलिग्राम यूजर्स 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com