Water Crisis : पाण्यासाठी पुन्हा 15 दिवस प्रतीक्षा; धुळे शहरातील स्थिती!

water and electricity crisis in dhule news
water and electricity crisis in dhule news esakal

धुळे : एकीकडे महापालिकेचे अधिकारी अक्कलपाडा योजनेद्वारे धुळेकरांना एप्रिलमध्ये पाणी देण्याचे स्वप्न दाखवत असताना आजघडीला उन्हाळ्याची (Summer) तीव्रता वाढल्याबरोबर नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. (Complaints have started that regular 8 day water supply has gone up to 15 days dhule news)

काही भागात नियमित आठ दिवसांचा पाणीपुरवठा दहा-पंधरा दिवसांवर गेल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा झाल्यानंतर नेमका त्याच वेळी वीजपुरवठा गायब होत असल्याने आठ दिवसांनंतरही नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरवात झाल्यानंतर लगेचच शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा इफेक्ट पाहायला मिळत आहे. विविध कारणांनी विविध भागांत दहा-पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. काही नगरसेवकांनीही याबाबत स्थायी समिती सभेत तक्रारी केल्या. मात्र, यावर ठेवणीतली उत्तरे दिली गेली.

विजेचा फटका

काही भागांत नियमित आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा झाल्यानंतर त्याच वेळी त्या भागातील वीज गुल होत असल्याची समस्या निर्माण होत आहे. मंगळवारी (ता. २८) शहरातील साक्री रोड भागातील सिंचन भवन परिसरात नियमित आठ दिवसांनंतर सकाळी पाणीपुरवठा झाला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

water and electricity crisis in dhule news
Burning Truck : नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार!

मात्र, नेमक्या त्याच वेळी ज्या भागात उशिरा पाणी पोचते अशा काही कॉलन्यांमधील वीजपुरवठा बंद झाला. दुपारी साडेबारा-एकपर्यंत वीज गायब असल्याने संबंधित नागरिकांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा पुढच्या आठ दिवसांत पाणी मिळणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची जास्त गरज असताना अशा समस्यांमुळे नागरिक हैराण होत आहेत.

तेव्हा खापर-आता काय?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानादेखील वीज गायब होण्याची समस्या होती. त्या वेळी महापालिकेतील सत्ताधारी विशेषतः स्थायी समितीत तत्कालीन सभापती व सत्ताधारी सदस्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोडशेडिंग सुरू झाल्याचा फटका धुळेकरांना बसत असल्याचे कारण पुढे केले होते. आता तीच समस्या पाहायला मिळत असल्याने याचे खापर कुणावर फोडणार, असा साहजिक प्रश्‍न उपस्थित होतो.

water and electricity crisis in dhule news
Dhule News : 8 दिवसांत गळत्या न रोखल्यास कारवाई; महापौर प्रतिभा चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com