नंदुरबारला कृषी कायद्यांची होळी; पुरोगामी पक्ष, जनसंघटनांकडून निषेध 

धनराज माळी
Friday, 15 January 2021

भाजप सरकारच्या धोरणाचे समर्थक आहेत त्यांची समिती गठीत करुन बड्या उद्योगपती व कॉर्पोरेट लॉबीचे काम सोपे करीत आहेत.

नंदुरबार : केंद्रातील मोदी सरकारने तयार केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी संपूर्ण देशभर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आतापर्यंत ७ शेतकऱ्यांनी प्राणाची आहुती दिली आहे. देशातील ५०० जनसंघटना मिळून किसान संयुक्त मोर्चा स्थापन करुन हे आंदोलन सुरु आहे. अशात नंदुरबार शहरात शुक्रवारी (ता.१५) नेहरु चौकात या कायद्यांची सार्वजनिक होळी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. 

आवश्य वाचा- दुर्मिळ आजार बालिकेला जडला; डॅाक्टरांनी असे केले, की 'ती' स्वतःच्या पायावर घरी चालत गेली !

न्यायालयाने कायदे पूर्णतः रद्द करण्याऐवजी त्याला फक्त स्थगिती दिली आहे व जे कृषी कायदे व भाजप सरकारच्या धोरणाचे समर्थक आहेत त्यांची समिती गठीत करुन बड्या उद्योगपती व कॉर्पोरेट लॉबीचे काम सोपे करीत आहेत. हे शेतकऱ्यांना अमान्य आहे. या तथाकथित कमिटीचा धिक्कार करुन या कायद्याची आज देशभर व नंदुरबार शहरात पंडीत नेहरु चौकात सार्वजनिक होळी केली.

वाचा- नंदुरबार जिल्ह्यात ४४१ सहकारी संस्थांची होणार निवडणूक; प्राधिकरणाकडून कार्यक्रम जाहीर 
 

कायद्याच्या प्रति जाळल्या

किसान समन्वय समितीच्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन यांच्या नेतृत्वाखाली विविध पुरोगामी पक्ष व जनसंघटनांनी कायद्याच्या प्रती जाळल्या. यावेळी अरुण रामराजे, नानासाहेब ठाकरे, रविभाऊ मोरे, सुनिल साळवे, कैलास पेंढारकर, दीपक भालेराव, दगा भगा मोरे(माजी सरपंच), विजय पवार, बापू ठाकरे(उपसरपंच) विजय पवार, वनाशीबाई ठाकरे, अरुणाबाई भिल, सुकमाबाई भिल, सनुभाऊ व शिवरामभाऊ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress marathi news nandurbar congress movement against agricultural law