Kasaba Bypoll Election : कसब्यातील विजयाचा धुळ्यात जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kasaba election

Kasaba Bypoll Election : कसब्यातील विजयाचा धुळ्यात जल्लोष

धुळे : राज्यातील पुणे-कसबा मतदारसंघात भाजपच्या (BJP) गडाला सुरुंग लावत महाविकास आघाडीच्या उमेदरावाने तेथे विजय मिळविला. या विजयाचा धुळ्यात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी जल्लोष केला. (Constituent parties of Maha Vikas Aghadi cheered for winning kasba bypoll election dhule news)

विधानसभा पोटनिवडणुकीत पुण्यातील कसबापेठ मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. गेल्या २५ वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. भाजपच्या या बालेकिल्ल्याची जागा श्री. धंगेकर यांनी हिसकावून घेतली.

या विजयाबद्दल धुळ्यात काँग्रेस भवनसमोर काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. कसबा मतदारसंघात भाजपने धनशक्तीचा वापर केला. त्यांची धनशक्ती उलथवून लावत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कौल दिला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

भाजपला त्यांची जागा दाखविली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे युवराज करनकाळ यांनी दिली. मुकुंद कोळवले, रमेश श्रीखंडे, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, धीरज पाटील, भरत मोरे, विनोद जगताप, भिवसन अहिरे, तेजस गोटे, संजय बगदे, प्रशांत भदाणे, वसीम बारी, बानुबाई शिरसाठ, राजेंद्र खैरनार, दीपक पाटील, दीपक गवळे, प्रकाश शर्मा, मच्छिंद्र येरडावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :CongressDhuleelection